शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

दुष्काळ निवारणार्थ ९२ ‘निर्माणी’ एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 11:38 PM

यंदाच्या वर्षीही भीषण दुष्काळ असून राज्य शासनाने २६ जिल्ह्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. यातील ११२ तालुक्यांत गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देहिवरा अन् दिंदोडा गावात निवासी शिबिर : जाणून घेतले पाण्याचे महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षीही भीषण दुष्काळ असून राज्य शासनाने २६ जिल्ह्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. यातील ११२ तालुक्यांत गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. या दुष्काळ निवारणार्थ ‘निर्माण’च्या कृती शिक्षण उपक्रमांतर्गत सेलू तालुक्यातील हिवरा आणि दिंदोडा गावामध्ये त्रि-दिवसीय निवासी शिबीर पार पडले. यात राज्यभरातील ९२ निमार्णी युवा सहभागी झाले होते.महाराष्ट्रातील युवांना सामाजिक समस्यांविषयी सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने पद्मश्री डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने ‘निर्माण’ हा उपक्रम जून २००६ मध्ये सुरू झाला आहे. या उपक्रमात सहभागी झालेले राज्यासह देशभरातील युवा विविध सामाजिक प्रश्नांवर काम करीत आहेत. शासनाबरोबरच विविध सामाजिक संस्था आणि संघटना आपापल्या परीने यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुष्काळाला हरवण्यासाठी पाणी फाऊंडेश मागील तीन वर्षांपासून विशेष प्रयत्न करीत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून श्रमदान करून राज्यातील बरीच गावे जलसंवर्धनाची कामे करत आहेत. सेलू तालुक्यातील हिवरा आणि दिंदोडा ही दोन गावे स्वत:ला पाणीदार करून घेण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. गाव पाणीदार व्हावे याच उद्देशाने हिवरा व दिंदोडा या गावात पार पडलेल्या विशेष शिबिरात नागपूर, मुंबई, अकोला, वर्धा, पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, चंद्रपूर, वाशिम अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले डॉक्टर, इंजिनीअर, समाजकार्य, वकील आदी सहभागी झाले होते.तयार केला आराखडाशिबिरार्थी युवांनी गाव, पाण्याचा प्रश्न, त्याची गंभीरता, त्यावरील उपाय, गावातील जीवनमान या गोष्टी अनुभवल्या आणि या पुढे मी शेती आणि पाण्यासाठी काय कृती करू शकतो त्याचा प्रत्येकांनी स्वत:चा आराखडा आखला. दोन्ही गावात एकूण ९४० घनमिटर एवढे काम झाले. ज्यामध्ये १४ लाख ११ हजार किंमतीचे ४७० टँकर पाणी सामावू शकेल. डॉ. उल्हास जाजू यांनी शिबिरार्थांना मार्गदर्शन केले.श्रमदानाने झाली सुरुवातशिबिरासाठा आलेल्यांचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. तसेच शिबीराची सुरूवात श्रमदानाने झाली. श्रमदानाव्यतिरिक्त शिबिरात पाणीप्रश्न समजून घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यात शेती आणि पाणीप्रश्नांवर काम करणारे मंदार देशपांडे यांनी ‘पाणी आणि मी’ या विषयावर मार्गदर्शन केले. गावातील पाण्याची समस्या कशी आणि का निर्माण झाली या बाबतीत शिबिरार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.