लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहराच्या हद्दीतील स्टेशन फैल परिसरात शहरात होणाऱ्या घरफोडी संदर्भाने गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे नाकाबंदी करीत दारू वाहतूकप्रकरणी दोघांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून एकूण ३९ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.नाकाबंदीदरम्यान दारू वाहतूक करताना रोहीत राजेश कैथवास (१९), लक्ष्मण बिसन मरसकोल्हे (४२) दोघेही रा. स्टेशन फैल यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ असलेल्या बॅगची पोलिसांनी झडती घेतली असता विनापरवाना विदेशी दारूच्या १८० मि. लि. च्या ६९ बाटल्या, किमंत १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दुसºया कारवाईमध्ये अजय मोतीराम कुकरेजा (४२) रा. दयालनगर याला अटक करण्यात आली. त्याच्या बॅगची झडती घेतली असता विनापरवाना विदेशी दारूच्या १८० मि. लि. च्या ७५ बाटल्या, २१ हजार ८५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवाईत आरोपींकडून ३९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारू वाहतूकप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.ही कारवाई पोलीस अधीक्षक, डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशावरून पो.हवा. संतोष दुरगुडे, पो.ना. चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, प्रदीप वाघ यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली.शहरात मागील काही दिवसांपासून दारूची चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर वाहतूक याशिवाय केली जात आहे. मात्र, पोलीस विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने दारूचा महापूर वाहत असल्याचे चित्र आहे. पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
३९ हजारांचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:30 PM
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहराच्या हद्दीतील स्टेशन फैल परिसरात शहरात होणाऱ्या घरफोडी संदर्भाने गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे नाकाबंदी करीत दारू वाहतूकप्रकरणी दोघांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून एकूण ३९ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दोन जणांना अटक