वर्धा : मणिपूर राज्यातील घटनेच्या निषेधार्थ वर्धा शहरात रविवारी सायंकाळी ४० सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून निषेध मोर्चा काढण्यात आला. शहरातील मगन संग्रहालयातून सुरू झालेले निषेध मोर्चात काळे कपडे परिधान करून शेकडोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते . त्या मोर्चाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली. उल्लेखनीय बाब म्हणजे या मोर्चा महिलांची संख्या लक्षणीय होती.
४० सामाजिक संस्थांच्या पुढाकारांना वर्धा येथे निघाला निषेध मूक मोर्चा
By अभिनय खोपडे | Updated: July 23, 2023 20:50 IST