वर्धा : वर्धा जिल्ह्याचे सुपुत्र व महान क्रांतिकारी तसेच आंतरराष्ट्रीय कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा पुतळा मेक्सिको देशातील शापिंगो येथील नॅशनल स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर विद्यापीठात बसविण्यात आला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिकोच्या शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉ. खानखोजे यांचे सारे आयुष्य संघर्षमयी घटनांनी भरलेले आहे. खानखोजे यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८३ ला वर्धा येथे झाला. त्यांनी आजोबाकडून स्वातंत्र्यलढ्याचा वारसा घेतला. त्यांनी ‘आझाद-ए-हिंद’ संस्था स्थापन केली. नंतर तिचे नामकरण ‘गदर पार्टी’ असे करण्यात आले.
मेक्सिकोच्या कृषी विकासात योगदानडॉ. खानखोजे यांनी शेतीशास्त्रात मास्टर ऑफ सायन्सची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते नॅशनल स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर शापिंगो सिटी मेक्सिको येथे प्रोफेसर म्हणून नोकरीला लागले. या काळात त्यांनी मका, गहू, डाळ, रबर आदींवर शोधकार्य केले. त्याचा हा गाैरव करण्यात आला आहे.