लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या या हेतूने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली; पण मध्यंतरी राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कर्जमुक्तीसाठी महत्त्वाची प्रणाली असलेली आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया थप्प झाली होती. मात्र, आता ही प्रक्रिया पुन्हा नव्या जोमाने वर्धा जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. सदर प्रक्रिया सुरू झाल्याने हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील ५८ हजार १८६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले. त्यापैकी ५० हजार १८५ शेतकऱ्यांनी आधार कार्ड सलग्न केले होते. या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड प्रमाणीत करणे क्रमप्राप्त आहे. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी ४२ हजार २८४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीत केले होते. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यातील ७ हजार ९०१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणित करण्याच्या विषयाला ब्रेक लागला होता.तर आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे हवालदिल शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे.३८,२७३ शेतकऱ्यांनी दिली ३४३.०९ कोटींची रक्कमजिल्ह्यातील ३८,२७३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ३४३.०९ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे. असे असले तरी अनेकांना अजूनही कर्जमुक्तीची प्रतीक्षा आहे.१,९७८ अर्जात आढळल्यात त्रुट्याऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आलेल्या एकूण अर्जापैकी १ हजार ९७८ अर्जात विविध त्रुट्या असल्याचे छाणणीदरम्यान निदर्शनास आले. त्यापैकी ७२१ प्रकरणे जिल्हा समितीकडे पाठविण्यात आले. त्यापैकी सध्या ८७ प्रकरणे प्रलंबीत आहेत. तर तालुका समितीकडे १ हजार ९८ प्रकरणे पाठविण्यात आली. त्यापैकी सध्या ७२ प्रकरणे प्रलंबीत असल्याचे सांगण्यात आले.महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक, वर्धा.
कर्जमुक्तीसाठी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 5:00 AM
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर झाल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील ५८ हजार १८६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केले. त्यापैकी ५० हजार १८५ शेतकऱ्यांनी आधार कार्ड सलग्न केले होते. या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड प्रमाणीत करणे क्रमप्राप्त आहे. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी ४२ हजार २८४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीत केले होते.
ठळक मुद्देहवालदिल शेतकऱ्यांना मिळणार आधार