लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महसूल विभाग हा जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी काम करतो. काम करण्याची क्षमता आणि सामर्थ्य असलेला हा विभाग आहे. महसूल कर्मचाºयांनी आपल्याला खूप काम आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा हे काम करण्याचे सामर्थ्य केवळ महसूल कर्मचाºयांमध्ये आहे, याचा अभिमान बाळगुन लोकांच्या व शासनाच्या अपेक्षा पूर्ण कराव्या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.विकास भवन येथे मंगळवारी आयोजित महसूल दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी संगीता राठोड, तहसीलदार एम. आर. चव्हाण, गटविकास अधिकारी स्वाती इसाये उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, महसूल विभागासोबत प्रत्येक नागरिकांचे काम असतेच. महसूल दिनाच्या निमित्ताने सर्व महसूल मंडळात आज पीक कर्ज आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाचा लाभ शेतकºयांना देण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे. त्यासाठी सर्व बँकर्स आणि महसूल विभागाच्या कर्मचाºयांचा सत्कारही केला शेतकºयांचे सर्व प्रश्न सोडवू अशी शपथ आज घ्यावी असे आवाहन नवाल यांनी यावेळी केले.अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी महसूल विभागाचे कर्मचारी कोणतेही काम करू शकतात, असे सांगून मोवाडचा पूर व लातूरचा भूकंपामध्ये कर्मचाºयांनी दिवसरात्र काम केले. याशिवाय वीज वितरण च्या कर्मचाºयांचा संप असताना गावातील दिवे चालू बंद करणे आणि देखभाल करण्याचे कामही केले. काही वर्षापूर्वी शिक्षकांनी इयत्ता दहावी व बारावी च्या परीक्षांवर बहिष्कार टाकला तेव्हाही त्या परीक्षा व्यवस्थितपणे घेण्याचे काम महसूल विभागाने केल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर हाफकीन इंस्टिट्युटला सर्पदंशावरील औषध तयार करण्यासाठी साप पकडून देण्याचे कामही एकेकाळी या विभागाने केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमात उपस्थित अधिकाºयांनीही उपस्थित कर्मचाºयांना मार्गदर्शन केले.यावेळी पुनर्वसित गावातील शेतकºयांना सातबारा, रेशन कार्ड, निवडणूक ओळख पत्राचे वाटप करण्यात आले. उपविभागीय अधिकारी संगीता राठोड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, बँकेचे अधिकारी तसेच नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
कोणतेही काम करण्याचे सामर्थ्य महसूल विभागातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:52 AM
हसूल विभाग हा जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी काम करतो. काम करण्याची क्षमता आणि सामर्थ्य असलेला हा विभाग आहे.
ठळक मुद्देशैलेश नवाल : महसूल दिनी सातबारा, ओळखपत्राचे वितरण