शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

मोकाट जनावरांमुळे अपघात

By admin | Published: July 21, 2016 12:49 AM

शहरात सर्वत्र मोकाट जनावरांना मुक्त संचार आढळतो. रस्तोरस्ती जनावरे कधी कळपाने तर कधी एकटीदुकटी फिरत असतात.

पालिकेचे दुर्लक्ष : जनावरांचा वाली कोण हा प्रश्नच वर्धा : शहरात सर्वत्र मोकाट जनावरांना मुक्त संचार आढळतो. रस्तोरस्ती जनावरे कधी कळपाने तर कधी एकटीदुकटी फिरत असतात. शहरातील रस्त्यांवर आधीच अतिक्रमण असल्याने जनावरांचा संचार अपघातास निमंत्रण देत आहे. असे असतानाही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणे व जनावरांच्या मालकांकडून दंड वसूल कारणे गरजेचे आहे. तसे केल्यास मोकाट जनावरांवर अंकुश लावला जाऊ शकतो. पण मोकाट जनावरांच्या मालकांवर कुठलीही कारवाई होत नसल्याने आणि जनावरांना पकडल्यास त्यांना ठेवण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शहरात शिवाजी चौक ते बजाज चौक हा मुख्य मार्ग, इंदिरा गांधी पुतळा परिसर, बसस्थानक ते डॉ. आंबेडकर चौक, आर्वी नाका ते कारला चौक, बजाज चौक ते रल्वे स्थानक आदी मार्गांवर दिवसभर मोकाट जनावरे फिरत असतात. दुभाजकांवर उभे राहणे, दुभाजकांनाच रेटून बसणे, रस्त्यांच्या मधोमध उभे राहणे असे प्रकार जनावरे करीत असतात. शहरात आधीच वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यातच अतिक्रमणही वाढले झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील जनावरांना संचार वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरत आहे. जनावरे अन्नाच्या शोधात हातगाड्यांजवळ जातात. हातगाडीचालकांनी हकलताच जनावरे रस्त्यावर सैरावैरा पळतात. त्यातच मोठी वाहनेही कर्णकर्कश्य आवाजात हॉर्न वाजवून जनावरांना दूर सारण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गोंधळलेली जनावरे कधी वाहनांवर जाऊन धडकतात तर कधी रस्त्याच्या मधोमधच उभी राहतात. अश्यावेळी वाहनचालकांना वाट काढणे कठीण जाते. शहरातील मुख्य मार्ग हा लहआ लहान दुभाजकांनी विभागला गेला आहे. वाहनचालक रस्ता ओलांडताना जनावरे तेथे उभी असल्यास वाहने एकमेकांवर आदळतात. हा सर्व प्रकार अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)