दारूच्या कारमधून : वाहनासह २४ पेट्या दारू जप्तसमुद्रपूर : दारूची अवैधरितया वाहतूक करणाऱ्या कारच्या चालकाने समोर उभ्या असलेल्या पोलिसांच्या खासगी वाहनाला धडक दिली. यात सुदैवाने ठाणेदार मुंडे बचावले; पण किरकोळ जखमी झाले. ही घटना जामनजीक बुधवारी रात्री घडली. यात कारमधील दारूसाठा जप्त करण्यात आला.नागपूरकडून कार क्र. एमएच ३२ सी ५९५० मध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा आणला जात असल्यची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून ठाणेदार प्रवीण मुंडे यांनी सहकाऱ्यांसह खासगी वाहन क्र. एमएच ३२ सी ५६६९ ने जाऊन एकीकडून नाकाबंदी केली. दुसरीकडून पोलीस वाहनातून पीएसआय बुरंगे हे सहकाऱ्यासह उभे होते. दरम्यान, नाकाबंदी तोडून वाहन भरधाव चंद्रपूरकडे निघाले असता मुंडे यांनी सदर वाहनाचा पाठलाग सुरू केला. ते वाहन आरंभा टोलनाका येथून परत पलटल्यावर पुन्हा समोर पोलीस वाहन दिसल्याने ते वाहन विरूद्ध दिशेने निघाले. त्याचवेळी समोर ठाणेदार मुंडे हे खासगी कारसह होते. यावेळी दारूची वाहतूक करणाऱ्या कार चालकाने ठाणेदार मुंडे यांच्या कारला धडक दिली. यात मुंडे यांना डोकाला किरकोळ जखम झाली तर शिपाई अजय घुसे, विरेंद्र कांबळे यांना काहीही लागले नाही. यात कारचा चालक फरार होण्यात यशस्वी झाला. एका आरोपीला अटक करण्यात आली. कारची तपासणी केली असता विदेशी दारूच्या २४ पेट्या किंमत २ लाख २४ हजार ८०० रुपये व कार ४ लाख असा ६ लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी सचिन आनंद ठेकले (३१) रा. पुलगाव याला अटक करण्यात आली असून कार चालक फरार झाला. ही कारवाई ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्यासह पीएसआय चांगदेव बुरंगे, विरेंद्र कांबळे, अजय घुसे, राधेश्याम घुमे, राजू जयसिंगपूरे आदींनी पार पाडली.(तालुका प्रतिनिधी)खापरी शिवारातून दारूसाठा जप्तसेलू : होळी हा सण शांततेत पार पडावा म्हणून पोलिसांकडून दारूविक्रेत्यांवर धाडसत्र राबविले जात आहे. यात स्थानिक पोलिसांनी हद्दीतील खापरी शिवारात दारूभट्टीवर धाड टाकली. यात तीन लोखंडी ड्रममध्ये असलेली सुमारे ३०० लिटर दारू किंमत १५ हजार ६०० रुपये नष्ट करण्यात आली. या प्रकरणी मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ ( एफ) अन्वये बेबी वसंतराव वासकर रा. खापरी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होळीसाठी लगतच्या नागपूर, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातून वर्धा दारूबंदी जिल्ह्यात अवैधरित्या दारू आणली जात आहे. शिवाय हातभट्ट्यांनाही उधान आले आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांकडून दारूविके्रत्यांविरूद्ध धाडसत्र राबविले जात आहे.
दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला अपघात, दारूसाठा जप्त
By admin | Published: March 10, 2017 12:56 AM