वर्धा : वर्ध्यातील पत्रकार रवींद्र कोटंबकर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणात तब्बल 10 दिवसानंतर पोलिसांनी आरोपीला औरंगाबाद येथील करमाळा येथून अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता 4 मे रोजीपर्यंत पोलीस कोठाडीत ठेवण्याचा आदेश दिला.
रजत उर्फ लाला तभाणे (40) रा. नागपूर असे अटक आरोपीचे नाव आहे. 19 एप्रिल रोजी पत्रकार रवींद्र कोटंबकर यांच्यावर हल्ला झाला होता. यात त्यांचे हात पाय मोडले असल्याने नागपूर येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेच्या 10 दिवसानंतर या प्रकरणी 1 आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
आरोपी लाला याच्यावर नागपूरसह अनेक पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. घटनेपासून आरोपी फरार होता. माहितीच्या आधारे पोलिसांनी करमाळा येथे जाऊन आरोपीला रात्री अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता आरोपी लाला याला ४ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. उर्वरित आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.