अभिनय खोपडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या पुढाकारातून व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याकरिता वर्धेत विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.आरोपीचे आधार संलग्न ठसे बायोमेट्रीकद्वारे उमटविताच त्याची गुन्ह्याबाबतची कुंडली समोर येणार आहे. ही नवी यंत्रणा गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढविण्याकरिता लाभदायक ठरणार आहे.प्रभावी दारूबंदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गुन्हे माहिती व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये आरोपीला अटक केल्यानंतर आधार संलग्न बायोमेट्रीकद्वारे त्याने दाखल केलेल्या वैयक्तीक बंधपत्राची माहिती उपलब्ध होत आहे.गुन्हा कोणत्या पोलीस ठाण्यात कोणत्या कलमान्वये नोंद झाल्यास किती रक्कमेचे बंधपत्र घेतले, जमानतदाराची संपूर्ण माहिती व आरोपीवरील गुन्ह्याची अद्यावत माहिती उपलब्ध होत आहे. वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत या प्रणालीद्वारे दारूबंदीचे गुन्हे दाखल झालेल्या २ हजार १४५ आरोपींची नोंद झाली. १० आरोपींना शिक्षा झाल्या. १२ आरोपी शिक्षेला पात्र ठरले आहेत. इतर गुन्हेगारांचीही हिस्ट्री आरोपीच्या बोटाचे ठसे घेताच केवळ दारूबंदीच नाही तर त्याच्यावर असलेल्या इतर गुन्ह्यांचीही माहिती यातून मिळणार आहे. याच प्रकारातून चोरी, हत्या, दरोडे यासह विविध गुन्ह्यातील आरोपींचीही माहिती जिल्हा प्रशासन ठेवत आहे. याचा लाभ गुन्हे उघड करण्याकरिता होत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गतवर्षी सुमारे ६ हजार ७०० तर यंदा विविध गुन्ह्यात अटकेतील सुमारे १० हजार ५०० आरोपींच्या बोटांचे ठसे घेण्यात आले आहेत.
बोटांच्या ठशांवरून निघेल आता आरोपीची कुंडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:44 AM
जिल्ह्यातील दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या पुढाकारातून व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याकरिता वर्धेत विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
ठळक मुद्देप्रभावी दारूबंदीचे प्रयत्न वर्धेत विशेष यंत्रणा कार्यान्वित