वर्धा : मुरुम व माती चोरी प्रकरणातील आरोपी एम.पी. कन्स्ट्रक्शनचे आशीष दफ्तरी यांनी जामिनाकरिता न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. सेलूच्या कनिष्ठ न्यायालयात हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.राज्यातील सर्वांत मोठ्या मुरुम आणि माती चोरी प्रकरणातील आरोपी आशीष दफ्तरी याची गुरुवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश मस्के यांनी आशीष दफ्तरीला २३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.न्यायालयीन कोठडीत रवानगीचा आदेश पारित होताच जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यामुळे दफ्तरीला न्यायालयीन कोठडीशिवाय आता पर्याय नाही.
मुरुम चोरीप्रकरण: आशिष दफ्तरीचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 3:32 AM