लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षण क्षेत्रातील जेष्ठ कार्यकर्ते भीमराव भोयर यांना सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेचा ग. वि. अकोलकर पुरस्कार जेष्ठ साहित्यिक व विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.भोयर यांच्या शिक्षणवाटा चोखाळताना या पुस्तकासाठी त्यांना सदर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या साहित्य प्रकारात निवड झालेल्या गणेश मतकरी, श्रीरंजन आवटे, संदीप राऊत, अनिल सहस्त्रबुद्धे, माणिक कोतवाल, निलम माणगावे आदींनाही सन्मानित करण्यात आले. मनोगत व्यक्त करताना भोयर यांनी सांगितले की, शिक्षण प्रक्रियेत सर्वत्र घोळ झालेला असताना खास करुन ग्रामीण भागातील शिक्षकांची जबाबदारी सध्या वाढली आहे. शिक्षकांनी अधिक सजग होवून, तळमळीने व निष्ठा ठेवुन विद्यार्थी घडविण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उद्याचा उत्तम शिक्षक, अधिकारी, लेखक, पत्रकार, वैज्ञानिक, गायक आणि कलावंत दडलेला असू शकतो. केवळ अर्थार्जनासाठी नोकरी करावा असा हा पेशा नाही तर येथे स्वत:ला झोकुन नवनिर्माण करणाºयांची गरज असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला किशोर पाठक उपस्थित होते.
अकोलकर पुरस्काराने भोयर सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:12 PM