शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

आदर्शनगरवासींची घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 9:13 PM

आदर्शनगर येथील रहिवासी पाणीसमस्येचा सामना करीत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासनापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी शनिवारी रिकाम्या घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत आवारात धरणे दिले.

ठळक मुद्देदिले धरणे, टंचाईवर तोडगा काढण्याची मागणी । तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : आदर्शनगर येथील रहिवासी पाणीसमस्येचा सामना करीत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासनापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी शनिवारी रिकाम्या घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत आवारात धरणे दिले. सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देत पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला.दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच आदर्श नगरवासीयांना पाणी समस्येचा सामना करावा लागतो. आश्वासन आणि थातूरमातूर उपाययोजना करून बोळवणूक करण्यात येते. ग्रामपंचायत कार्यालयात याबाबत चौकशी केली तर उलटसुलट उत्तरे दिली जातात. इतकी वर्षे लोटूनही ग्रा.पं. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. पाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येइल असा इशारा रहिवाशांनी दिला.शनिवारी ग्रामपंचायतीची मासिक सभा सुरू असताना संतप्त नागरिकांनी धडक दिली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य मुरलीधर कुमरे व अर्चना कांबळे, विमल बोरकर, गीता गावंडे, रिना पाटील, वंदना खंडारकर, शुभांगी परचाके, नमिता ताकसांडे, शोभा वाघमारे, निर्मला मानकर, पंकज भुजाडे, शंकर ताकसांडे, राहुल पंधरे, आदेश कांबळे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.अगोदरच पाणी समस्येने रहिवासी त्रस्त झाले असून ग्रा.पं.प्रशासन खोटे आश्वासन देऊन दिशाभूल करीत आहे.दरवर्षीच पाण्याची समस्या उभी ठाकते. मात्र, ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. रहिवाशांनी त्रासच सहन करायचा का? पाणीसमस्येवर लवकर तोडगा काढण्यात यावा.-रोशन तेलंग,रहिवासी आदर्शनगर.आदर्शनगरात पाणीटंचाई आहे. उपाययोजनेबाबतचा ठराव घेण्यात आला असून सोमवारी जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल. टँकरने पाणीपुरवठा किंवा अन्य ठिकाणाहून उपाययोजना करावी याकरिता जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.-रोशना जामलेकर, सरपंच सेवाग्राम.पथदिव्यांचे देयक जि.प.भरत होते. ते त्यांनी भरण्यास नकार दिला. आता देयक थकीत आहे. वीज वितरण कंपनीला प्राकलन पाठविले; पण त्यांनीसुद्धा ते मान्य केले नाही. ज्या विहिरीतून पाणी देण्याचे ठरले होते, तेथे वीजजोडणी नसल्याने आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी काम करायला तयार नसल्याने तो प्रस्ताव बारगळला.- संजय जवादे, सदस्य आदर्शनगर.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई