लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोरोनासोबतचे युद्ध छोटे नाही. शिवाय त्यासाठी मोठा कालावधीही लागू शकतो, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वर्धा येथील अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांच्या मुलीचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने उरकवित बचत झालेले ५१ हजाराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिली आहे. त्यांचे हे कार्य इतर अधिकाऱ्यांसाठी तसेच लॉकडाऊनमध्ये साध्या पद्धतीने लग्न सोहळे उरकविणाºयांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांची मुलगी निकीता हिने एमटेक (इलेक्ट्रीक) चे शिक्षण घेतले आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील विजय बालपांडे यांचा मुलगा मनोज यांच्याशी तिचे लग्न जुळले. लग्नाची तारीख जशी जवळ आली त्याच वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर शासनाच्या सूचनांना केंद्र स्थानी ठेऊन हा विवाह सोहळा अतिशय साध्या पद्धतीने आणि मोजक्याच कुटुंबीयांच्या उपस्थित उरकविण्यात आला. मुलीच्या लग्नावरील होणारा खचार्ची मोठी बचत झाल्याने ही रक्कम योग्य कामी लावावी असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानंतर त्यांनी पत्नी आशा व मुलगा संकेत याच्याकडे सदर विषय सांगितला. त्यांच्यासह मुलगी निकीता तसेच जावाई मनोज यांनीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत बचतीची रक्कम देण्याच्या विषयाला होकार दिला. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५१ हजारांची रक्कम दिली आहे.
वर्ध्याच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी मुलीच्या लग्नाचे पैसे दिले कोविड युद्धासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 3:34 PM
वर्धा येथील अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांच्या मुलीचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने उरकवित बचत झालेले ५१ हजाराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिली आहे.
ठळक मुद्देमुख्यमंत्री सहायता निधीत ५१ हजारांची मदत