मुख्याध्यापक संघ : अन्यथा बहिष्कारवर्धा : माध्यमिक शाळांची २०१५-१६ ची संच मान्यता देण्यात आली. शासन निर्णयानुसार इयत्ता नववी, दहावीसाठी तीन शिक्षक अनुज्ञेय आहे; पण दोन शिक्षक मंजूर करण्यात आले. यात सुधारणा करून तीन शिक्षकांची पदे मंजूर करावी. शिवाय तत्सम रिवाईज्ड संच मान्यता द्यावी, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाने केली. याबाबत शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना निवेदन देण्यात आले.तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी नागपूर विभागात केवळ वर्धा जिल्ह्यात इयत्ता नऊ आणि दहावीचे प्रशिक्षित शिक्षक संख्या २०१३-१४, २०१४-१५ मध्ये तीनऐवजी दोन पदे चुकून मंजूर केलीत. २०१५-१६ साठी तेथे किमान तीन शिक्षक अनुज्ञेय होणे गरजेचे होते; पण दोन शिक्षक मंजूर पदात दाखविले तर एक पद नियमित कार्यरत आहे. यामुळे संच मान्यता २०१५-१६ मध्ये इयत्ता नववी, दहावीला तीन शिक्षकांची पदे (कार्यरत व वित्तीय तरतुदीची) मंजूर करून रिवाईज्ड संच मान्यता देण्यात यावी. या चुकीची दुरूस्ती न झाल्यास ते अन्यायकारक ठरेल. जिल्हा माध्यमिक व उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संघाकडून समायोजनावर बहिष्कार टाकण्यात येईल. कुठलेही समायोजन जिल्ह्यात करता येणार नाही, याची दखल घ्यावी, असा इशारा अध्यक्ष सतीश जगताप, सचिव मनोहर बारस्कर, अनिल बाळसराफ, प्रदीप गोमासे आदींनी दिला.(कार्यालय प्रतिनिधी)
सुधारित संच मान्यतेने तीन शिक्षकांचे समायोजन करा
By admin | Published: September 10, 2016 12:35 AM