शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

महाकाय पिंपळापुढे प्रशासन हतबल

By admin | Published: May 13, 2016 2:13 AM

येथील सदानंद वॉर्डातील एक महाकाय पिंपळवृक्ष आलेल्या वादळात आडवे झाले. याला आठ दिवसांचा काळ झाला तरी हे झाड तसेच आहे.

झाड रस्त्यावरच : आठ दिवसांपासून वाहतूक ठप्पअल्लीपूर : येथील सदानंद वॉर्डातील एक महाकाय पिंपळवृक्ष आलेल्या वादळात आडवे झाले. याला आठ दिवसांचा काळ झाला तरी हे झाड तसेच आहे. त्याला येथून काढणे येथील ग्रामपंचायत प्रशासनालाही शक्य होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे या मार्गाची वाहतूक बंद झाली आहे. एका पिढीची साक्ष ठरलेला पिंपळवृक्ष चक्रीवादळामुळे मुळासह आडवा झाले. यामुळे या मुख्यमार्गाची वाहतुक ठप्प झाली असून अन्य मार्गाने ती वळती करण्यात आली आहे. हे झाड नारायण जोगे यांच्या घरावर पडल्याने त्यांच्या घरातील सोफा, टी.व्ही, दिवान, कपाट असे एकूण दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. या महाकाय वृक्षाला पाहुनच कुणाची हात लावण्याची हिंमत करीत नसल्यामुळे याची विल्हेवाट कुणी लावावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घर मालक इथे राहत नसल्याने यात कोणीही पुढाकार घेत नाही. याची माहिती वनविभागाला दिली असता त्यांनी झाड आमच्या हद्दीत येत नसल्याचे सांगितले. ही समस्या ग्रामपंचायतीची आहे. त्यांनी ती मार्गी लावावी. यामुळे समस्या कायमच आहे.(वार्ताहर)