शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

'समृद्धी'च्या उपकंत्राटदाराने पाच एकर शेत पोखरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 6:17 AM

सिंदीत तक्रार : मामला सेलू पो. स्टेशनकडे

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समृद्धी महामार्गाचे वर्धा जिल्ह्यातील मुख्य कंत्राटदार अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर्स व उपकंत्राटदार एम. पी. कन्स्ट्रक्शन्स यांनी मुरूम खोदण्यासाठी वर्धा व आर्वी तालुक्यात उच्छाद मांडला आहे.

राज्य सरकारने समृद्धी महामार्गासाठी मुरुमावरची ४०० रुपये प्रति ब्रास रॉयल्टी माफ केली आहे. त्याचा गैरफायदा घेत, या दोन्ही कंपन्या शेतकऱ्यांची परवानगी न घेता बेमूर्वतखोरपणे शेत खोदून मुरूम बाहेर काढत आहेत. अशाप्रकारे सुमारे १०० शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खोदून या कंपन्यांनी शेतकºयांचे शेकडो कोटींचे नुकसान करून ठेवले आहे. विशेष म्हणजे, पोलीस, महसूल व खनिकर्म विभागाचे अधिकारी या बेकायदेशीर उत्खननाकडे डोळेझाक करत असल्याने अ‍ॅफकॉन्स व तिचे १० ते १२ उपकंत्राटदार निर्ढावले आहेत.याचे उत्कृष्ट उदाहरण गणेशपूर येथील गंगाराम कोदामे मसराम या शेतकºयाचे आहे. कोझी प्रॉपर्टीजच्या जमिनीच्या सीमेजवळ मसराम यांची सात एकर शेतजमीन आहे. हे ठिकाण गणेशपूरपासून लांब जंगलात असल्याने मसराम व त्यांचे कुटुंबीय या शेताकडे फारसे जात नाहीत. नेमक्या याच स्थितीचा फायदा घेऊन अ‍ॅफकॉन्स व एमपी कन्स्ट्रक्शनने मसराम यांच्या शेतातील सातपैकी पाच एकर जमीन खोदून मुरुम चोरून नेला. मे व जून २०१९ असे तब्बल दोन महिने हे उत्खनन सुरू होते, अशी माहिती मसराम यांचे चिरंजीव मधुकर मसराम यांनी ‘लोकमत’ला दिली.

‘‘जुलैच्या शेवटी शेतावर गेलो असता हा धक्कादायक प्रकार कळला. अ‍ॅफकॉन्स व एम.पी. कन्स्ट्रक्शनचे अधिकारी यांची वारंवार भेट घेऊन शेताचे चार कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे ते भरून देण्याची विनंती केली पण कुणीही आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही म्हणून २४ आॅगस्ट २०१९ रोजी मी सिंदी पोलिसात तक्रार दाखल केली आहे’’, असे मधुकर मसराम यांनी सांगितले.सिंदीचे ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी सांगितले की, अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर व एम.पी. कन्स्ट्रक्शन यांचेविरुद्ध सेलू पोलीस स्टेशनमध्ये आधीच कोझी प्रॉपर्टीज व डॉ. राजेश जयस्वाल यांच्या तक्रारी असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने मसराम यांची तक्रारही सेलूला पाठवली आहे.

दरम्यान अ‍ॅफकॉन्सचे प्रकल्प प्रमुख बी. के. झा यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.वाचकांना हे आठवतच असेल की, कोझी प्रॉपर्टीजच्या केळझर येथील १००० एकर जमिनीपैकी तब्बल १०३ एकर जमिनीत बेकायदा उत्खनन करून अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरने व एम पी कन्स्ट्रक्शनने १०० कोटीचा मुरुम चोरून नेला होता. कोझी प्रॉपर्टीजने याची तक्रार सेलू पोलिसांत केली आहे. अ‍ॅफकॉन्सचे अधिकारी व उपकंत्राटदारावर एफ.आय.आर.सुद्धा दाखल झाला आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस