शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

तब्बल २५ वर्षांनी बससेवा सुरू

By admin | Published: May 12, 2016 2:27 AM

जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या वानरचुवा या गावात तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामंडळाची बस सेवा मंगळवारी सुरू करण्यात आली.

वानरचुवा ग्रामस्थांची प्रतीक्षा संपली : गावकऱ्यांनी व्यक्त केले समाधान गिरड : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या वानरचुवा या गावात तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामंडळाची बस सेवा मंगळवारी सुरू करण्यात आली. बस सेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. बस गावात पोहोचल्यावर ग्रामस्थांनी आंब्याचे तोरण बांधून बस सजविली. मोहगावचे उपसरपंच कैलास नवघरे व पोलीस पाटील महादेव सलाम यांनी बसची पूजा केली. यावेळी बसचालक आर.जी. ठाकूर, मनोहर बलविर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विजय मसराम, दशरथ दुधकोहळे, वामन दोडके, बालु पसारे, भाजपचे तालुका सरचिटणीस बहादुरसिंग अकाली, गजानन गारघाटे, विलास नवघरे, कवडु कोटमकर, पुरुषोत्तम राऊत, किशोर रंदये उपस्थित होते. वानरचुवा या गावात २५ वर्षांपूर्वी हिंगणघाट डेपोची ताडोबा बस मोहगाव जंगल मार्गाने चिमूर ताडोबा येथे जात होती. ही बस हिंगणघाट, समुद्रपूर, गिरड, शिवणफळ, मोहगाव, वानरचुवा, मंगरूळ, आमडी, खडसंगी या मार्गाने जात असल्याने ही बस समुद्रपूर तालुक्यासाठी महत्वपूर्ण होती. पण कालांतराने ही बस अचानक बंद झाली. त्यामुळे या मार्गावरील वानरचुवा गावातील नागरिकांनी तेव्हापासून बस गावात पाहिलीच नाही. तेव्हापासून या गावातील नागरिक वारंवार ही बस सुरू करावी तसेच मोहगाव मार्गाने पक्का रस्ता बांधावा, अशी मागणी करीत होते. पण खोट्या आश्वासना व्यतिरिक्त त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. या २५ वर्षात कित्येक लोकप्रतिनिधी आले आणि गेले. बसचे दर्शन वानरचुवा ग्रामस्थांना झालेच नाही. ही बाब गावकऱ्यांनी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांना सांगत मोहगाव जंगल मार्गे रस्ता व बसची मागणी केली. ग्रामस्थांची मागणी आणि त्यांचा होत असलेली अडचण लक्षात घेत आमदार कुणावार यांनी लवकरच बस सुरू करणार असे आश्वासन ग्रमस्थांना दिले होते. भाजपचे तालुका सरचिटणीस बहादुरसिंग अकाली यांनीही हा प्रश्न लावून धरला.अखेर २५ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर मंगळवारी १० मे रोजी गावात बस पोहचली. गावात बस पोहोचल्याचे नागरिकही समाधान व्यक्त करीत होते. याच मागणीप्रमाणे मोहगाव ते वानरचुवा हा रस्ताही लवकरच पूर्ण व्हावा अशी अपेक्षा वामन दोळके, बालु पसारे, प्रकाश सहारे, बाबा पुनवटकर, गुलाब मसराम, हनुमान येटे, अंबादास मुडरे, सुरेश पुनवटकर, राजु पुनवटकर आदी नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. ७आ बसमुळे प्रवाश्यांना होत असलेली अडचण दूर झाली आहे.(वार्ताहर)