शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कारवाईनंतरही अतिक्रमण कायम

By admin | Published: September 08, 2016 12:42 AM

गत महिन्यात १७ आॅगस्ट रोजी नगर पालिकेच्यावतीने शहर पोलिसांच्या सहकार्याने शहरातील टिळक मार्केट

अध्यक्ष, उपाध्यक्षांचे दुर्लक्ष : टिळक मार्केट झाले बकालपराग मगर वर्धागत महिन्यात १७ आॅगस्ट रोजी नगर पालिकेच्यावतीने शहर पोलिसांच्या सहकार्याने शहरातील टिळक मार्केट परिसरात फळभाज्या विक्रेत्यांवर कारवाई करीत अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. विक्रेत्यांना टिळक मार्केटच्या आत जागाही देण्यात आली; पण ही कारवाईच औटघटकेची ठरली. एकही विक्रेता टिळक मार्केटमध्ये दिलेल्या जागेवर गेला नाही. यामुळे या कारवाईला अर्थ काय, हे अतिक्रमण कायमचे हटणार काय, असा प्रश्न शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. वर्धा शहरातील भाजी व फळ बाजाराची गरज लक्षात घेत १९८५ साली शहराच्या मधोमध गोल बाजारात लोकमान्य टिळक भाजी व फळ मार्केट या नावाने बाजार तयार करण्यात आला. प्रसाधनगृह आणि पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था येथे करण्यात आली. मार्केटच्या मधोमध असलेल्या विहिरीलगत लोकमान्य टिळकांचा अर्थकृती पुतळाही बसविण्यात आला. हळूहळू शहर वाढले तसतसे भाजी व फळविक्रेत्यांनी बाहेर रस्त्यांवर अतिक्रमण सुरू केले. काही काळातच मार्केटमध्ये कमी आणि बाहेरच अधिक दुकाने दिसायला लागली. त्यामुळे निर्माण झालेला अतिक्रमणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. पालिका प्रशासन वारंवार अतिक्रामण काढण्याचा प्रयत्न करते; पण दोनच दिवसांत चित्र जैसे थेच होऊन जाते. पदोपदी भाजी व फळविक्रेत्यांनी जागा बळकावून थाटलेल्या दुकानांमुळे वाहतुकीची वाट लागून अपघात वाढले आहेत. ही बाब ध्यानात घेऊन नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून १७ आॅगस्ट रोजी शहर पोलिसांच्या सहकार्याने अतिक्रमण काढायाला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर टिळक मार्केटच्या आत जागेचे मोजमाप करून रेषा आखून प्रत्येक विक्रेत्याला जागा देऊन उद्यापासून येथेच दुकान लावण्याबाबत सज्जड दम दिला. पण नगराध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित राहत नसल्याने प्रस्थापित असलेले फळ व भाजीविक्रे पोलिसांनाही जुमानत नसल्याचे वास्तव आहे. दोन दिवसांचा अल्टिमेटम विक्रेत्यांना देण्यात आला; पण २२ दिवस लोटूनही पालिकेचा अल्टिमेटम संपलेला नाही. एकही विक्रेता मार्केटमध्ये दुकान लावायला गेलेला नाही. ही कार्यवाही पुन्हा होणार काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.