विनोद घोडे।लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी): ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे देवळी तालुक्यातील पुलगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाºया मलातपूर येथील मतिमंद असलेला संजय उत्तम डहाके (वय ३८) हा तरूण तब्बल आठ वर्षांनी घरी परतला. यामुळे नातेवाईक आणि गावकºयांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.सविस्तर असे की, देवळी तालुक्यातील मलातपूर येथे संजयचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. संजय लहानपणापासूनच मतिमंद, चिडचिड्या स्वभावाचा होता. २०११ मध्ये मे महिन्यात त्याच्या आत्येबहिणीचे नगाजी महाराज देवस्थान, वर्धा येथे लग्न होते. या लग्नाकरिता त्याचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. सर्व जण लग्न सोहळ्यात मग्न होते. येथून संजय केव्हा बेपत्ता झाला, हे कुणाच्याही लक्षात आले नाही. त्याचा सर्वच ठिकाणी शोध घेतल्यानंतरही संजयचा पत्ता लागत नसल्यामुळे वर्धा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन-तीन वर्षे त्याच्या परिवाराने नातेवाईकांकडे व इतर ठिकाणी शोध घेतला, परंतु तो मिळाला नाही. संजय बेपत्ता झाल्यापासुन त्याच्या आईवर मोठा आघात झाला. यातच आई आजारी पडली आणि संजय परत येण्याची आशा पूर्णत: मावळल्याचे जाणून त्याच्या आईने २०१५ मध्ये जगाचा निरोप घेतला, अशी माहिती भाऊ अरविंद डहाके यांनी लोकमतला दिली आणि २३ डिसेंबरला संजय घरी परतला. संजय कित्येक दिवस वेड्यासारखा निर्वस्त्र कुठेही भटकायचा. भटकंतीदरम्यानतो थेट गुजरात राज्यातील सूरत येथे पोहोचला. त्याच्या पायांना मोठमोठ्या जखमा होत्या. त्याचे वेडेपणाचे लक्षण दिसून येत होते. श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन ता.कर्जत रायगड, या संस्थेचे समाजसेवक यांच्या ही बाब लक्षात येतात त्यांनी संजयला संस्थेत दाखल केले. या संस्थेमध्ये मतिमंद, वेड्यांना भारताच्या कानाकोपºयातून आणून त्यांच्यावर उपचार केले जातात, दुरूस्त झाल्यावर त्यांच्या गावी पोहोचविण्यात येते. ही सेवाभावी संस्था आहे. या संस्थेत पीडितांवर नि:शुल्क उपचार केले जातात. संजयवर तीन वर्षे उपचार करण्यात आला. वेगवेगळ्या चाचण्यासद्धा करण्यात आल्या. तीन वर्षांनी तो दुरूस्त झाल्याची खात्री तेथील डॉक्टरांना पटली. दरम्यान संजयने स्वगावाचा संपूर्ण पत्ता तेथील डॉक्टरांना सांगितला.सुरूवातीला तो केवळ त्याचेच नाव सांगत होता. आता बरा झाल्याने त्याने संपूर्ण पत्ता सांगितला. सांगितलेला पत्ता खरा असल्याची येथील सेवकांनी खात्री करून घेतली व या पत्याच्या आधारे पुलगाव पोलीस ठाण्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. पुलगाव पोलीस ठाण्याने मलातपूर येथील पोलीस पाटलांसोबत संपर्क साधला असता संजयने सांगितलेला पत्ता खरा असल्याचे सिद्ध झाले.श्रद्धा रिहॅबिलीटेशन फाऊंडेशनचे समाजसेवक समाधान पालकर यांनी २३ डिसेंबरला संजयला पुलगाव पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले. पोलिसांनी संजयला भाऊ, मलापूरचे पोलिस पाटील तसेच गावातील दोन-तीन नागरिकांच्या स्वाधीन केले. याशिवाय दोन महिन्यांचे औषधुसद्धा संजयसोबत दिले.भारतातील कोठेही मतिमंद, वेडी स्त्री, पुरूष, बालके दिसली तर या संस्थेचे समाजसेवक त्यांना या सेवाभावी संस्थेत घेऊन येतात व त्यांच्यावर नि:शुल्क उपचार करून दुरूस्त करतात.- समाधान पालकर, समाजसेवक, श्रद्धा रिहॅबिलिटेशन, वेणगाव, रायगड..
अन् तब्बल आठ वर्षांनी संजय घरी परतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 11:55 PM
‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीप्रमाणे देवळी तालुक्यातील पुलगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाºया मलातपूर येथील मतिमंद असलेला संजय उत्तम डहाके (वय ३८) हा तरूण तब्बल आठ वर्षांनी घरी परतला.
ठळक मुद्देकर्जतच्या श्रद्धा रिहॅबिलिटेशनचे अद्भूत कार्य : नातेवाईक, गावकऱ्यांमध्ये आश्चर्य