शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

नांदेड, संभाजीनगर नंतर गुजरात राज्यातील दोघे जेरबंद

By महेश सायखेडे | Published: August 28, 2023 5:26 PM

सावंगी (मेघे) च्या महिला लेक्चररची आर्थिक फसवणूक प्रकरण

वर्धा : सावंगी (मेघे) येथील महिला लेक्चररची आर्थिक फसवणूक प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी आहेत. या दोन्ही आरोपींची ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. अजय दत्तू पाटील व पृथ्वीश शिवाभाई मावाणी असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंगी (मेघे) भागातील रावत रेसीडेन्सी भागातील रहिवासी चित्रीका सुभदर्शनी सुधांशू पानीग्रही या व्यवसायाने लेक्चरर आहेत. त्यांना आरोपीने फोन करून आपण फेडेक्स कंपनीचा कर्मचारी असून पार्सल मध्ये दोन किलो कपडा, पाच पासपोर्ट, सहा क्रेडीट कार्ड व १४० ग्रॅम एम. डी. हे अंमली पदार्थ पकडले असल्याचे सांगून त्याकरिता १६,२५० रूपयांचे पेमेंन्ट त्यांचे आय. डी. वरून पाठविले असे सांगितले.

आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने मुंबई पोलीस सायबर क्राईम या नावाने स्काईप वरून कॉल करून भीती दाखवून तक्रारकर्त्याकडून तब्बल २ लाख ४७ हजार ७७६ रुपयांची रक्कम उकळून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत तपासाला गती दिली. सुरूवातीला आरोपी अंबादास जनार्धन कांबळे, रा. रा. नांदेड आणि अनिल संभाजी पाटील, रा. संभाजीनगर यांना १८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. तर इत्यंभूत माहिती हाती लागल्यावर वर्धा पोलिसांच्या पथकाने गुजरात राज्यातील सुरत गाठून अजय दत्तू पाटील व पृथ्वीश शिवाभाई मावाणी याला अटक केली.

या दोन्ही आरोपींकडून पाच मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. ही कारवाई सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे, वैभव कट्टोजवार, नीलेश तेलरांधे, रणजित जाधव, अनुप राऊत, अमित शुक्ला, अनुप कावळे, लेखा राठोड, प्रतिक वांदीले यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकwardha-acवर्धा