लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पं.) : नऊ वर्षांपूर्वी अचानक आपल्या बहिणीच्या घरून गेलेला मनोरुग्ण भाऊ नांदेड पोलिसांच्या मदतीने घरी सुखरूप आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना गहिवरून आले. जिल्ह्यातील तळेगाव श्या. पोलीस ठाण्याच्या हद्दीत आर्वी तालुक्यातील परतोडा येथे शुक्रवारी सकाळी हा आनंदाचा प्रसंग नागरिकांनी अनुभवला. दरम्यान नातेवाईकांसह गावकऱ्यांनी त्यांच्या घरी मोठी गर्दी केली होती.धर्मपाल सुखदेवराव तिखाडे (५२) रा. परतोडा ही व्यक्ती मनोरुग्ण असून अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील संगीताबाई दहाट या आपल्या बहिणीच्या घरून ९ वर्षांपूर्वी निघून गेला होता. तेव्हापासून अनेक वर्षे त्यांचा शोध नातेवाईकांनी घेतला, मात्र शोध लागला नाही. त्यांचे काय झाले, ते जीवित आहे की नाही, याच विवंचनेत कुटुंब होते. गुरुवारची सकाळ त्यांच्या परिवाराला आनंद देणारी ठरली.केरळ येथील दिव्य गारूना या सामाजिक संस्थेने मनोरुग्ण धर्मपाल यांचा मुलगा रूपेश याच्याशी संपर्क करून 'तुझे वडील हे आहेत का? या ठिकाणी आहे, ते सुखरुप आहेत, तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्यांना घरी घेऊन येत आहोत, असे म्हणत व्हॉट्सअॅपवरून व्हिडीओ कॉल करून ही खात्री करून घेतली. शुक्रवारी पोलीस मनोरुग्ण धर्मपाल तिखाडे यांना त्यांच्या घरी गावी परतोडाला सुखरूप घेऊन. आले यावेळी पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण, भाचे व कुटुंबातील लोकांना काही काळ विश्वासच बसत नव्हता. कारण धर्मपाल यांचा शोध घेऊन सारे थकून गेले होते. हयात आहे की नाही, हीच सर्वांना चिंता होती.पण, तब्बल ९ वर्षांनंतर मनोरुग्ण धर्मपाल सुखरूप दिसल्यानंतर कुटुंबातील सदस्य व बहिणीला आनंद गगनात मावेनासा झाला. या आनंदात सारे कुटुंब गहिवरून गेले होते. पोलिसांनी दूरवरून मदतकार्य करून त्या मनोरुग्ण व्यक्तीला सुखरूप घरी सोडून दिल्यानंतर नातेवाईकांनी दिव्य गारुना सामाजिक संस्थेच्या सचिव एलिसा बर्थ व अजित तोमस यांचे बांधिलकी जपल्याबद्दल आभारही मानले. तळेगाव पोलीस ठाण्यात मनोरुग्ण सापडल्याबाबत नोंद करण्यात आली. यावेळी संस्थेचे एलिसा बर्थ, अजित तोमस, तळेगाव श्या. ठाण्याचे पोलीस रवी राठोड, मुलगा रूपेश मुलगी अलका यांच्यासह नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुरुवारची सकाळ ठरली आनंददायीतुमचे वडील सापडले आहे, असे सांगणारा फोन पोलिसांकडून खणखणल्यानंतर काय आनंद घरच्यांना झाला असेल, हे त्यांच्याकडून जाणल्यानंतर अत्यंत भावनिक प्रतिक्रिया मनोरुग्ण व्यक्ती धर्मपाल यांचा मुलगा रूपेशने दिली. तो म्हणाला, आता त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन त्यांच्यावर आणखी योग्य पद्धतीने उपचार करून प्रकृती ठिक करण्याची धावपळ सुरू झाली. तब्बल ९ वर्षांनंतर १ हजार किलोमीटर दूर नांदेड येथून सुखरूप परतल्यानंतर परिवारात आनंद व्यक्त होत आहे.
तब्बल ९ वर्षांनंतर मनोरुग्ण धर्मपाल सुखरूप घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 1:02 AM
नऊ वर्षांपूर्वी अचानक आपल्या बहिणीच्या घरून गेलेला मनोरुग्ण भाऊ नांदेड पोलिसांच्या मदतीने घरी सुखरूप आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना गहिवरून आले. जिल्ह्यातील तळेगाव श्या. पोलीस ठाण्याच्या हद्दीत आर्वी तालुक्यातील परतोडा येथे शुक्रवारी सकाळी हा आनंदाचा प्रसंग नागरिकांनी अनुभवला.
ठळक मुद्देकेरळच्या सामाजिक संस्थेची मदत : नातेवाईक, शेजाऱ्यांना आले गहिवरून