लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहे. यात भाजप, काँग्रेस, राकाँ, शिवसेना, भाजप आदी पक्षाच्या पॅनलला मतदारांनी संमिश्र कौल दिला असल्याचे चित्र दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना मतदारांनी बहुमत दिले आहे.भोसा ग्रा.पं. निवडणुकीत नव्यांना संधीसिंदी (रेल्वे) : भोसा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनेलचा पराभव झाला. येथे सरपंचपदी पिंकी प्रविण अन्ड्रास्कर विजयी झाल्या. त्यांना ४९२ मिळाले. तर भाजप पॅनलच्या संध्या बाळू धनवटे यांना २८२ मते मिळाली. सदस्यपदी मंजुषा निमसडे १३५, रिना ढोबळे १२७ मते घेवून भाजप पॅनलकडून विजयी झाल्या. अन्ड्रास्कर गटाकडून महेश अवचट २३२, योगिता कुत्तरमारे २२६, नमिता महंतारे १९९, ज्ञानेश्वर चौधरी ११९, वनिता ढगे ११८ हे पाच सदस्य निवडून आले आहेत.ठाणेगावात कॉँग्रेस आघाडीचे वर्चस्वठाणेगाव : येथील ग्रामपंचायतीवर कॉँग्रेसप्रणीत आघाडीने विजय मिळवला आहे. येथे सरपंचपदी मिनाक्षी किशोर रेवतकर या विजयी झाल्या. त्यांनी अनिता उमाकांत धंडाळे यांचा पराभव केला. या ग्रामपंचायतीमध्ये ग्रा.पं. सदस्य म्हणूनकॉँग्रेसप्रणित आघाडीचे अरविंद आनंदराव नासरे, गोविंदा नामदेव खंडाते, स्वाती राजेश भांगे, साहेबराव वामन पांडे, वंदना प्रभाकर बगवे, मिना दिगांबर गजभिये, दिनेश बंडूजी कामडी, मंदा पंजाब धुर्वे या विजयी झाल्या आहेत. तर शिवसेना प्रणित पुष्पा पंजाबराव मूने यांना मतदारांनी बहूमताचा कौल देत विजयी केले. येथे माजी सरपंच साहेबराव पांडे गटाने बाजी मारली.बोरी (कोकाटे)च्या संरपचपदी विशाल भागेबोरधरण : बोरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विशाल भागे हे सरपंच म्हणून निवडून आले आहेत. शिवाय त्यांच्या गटाचे पाच ग्रा.पं. सदस्य विजयी झाले आहेत. तर येथे भाजप गटाला दोन जागेवर समाधान मानावे लागले. विशाल भागे यांच्या गटाचे सुधाकर पजाब किरडे, पुष्पा राजेश पेदाम, आकाश दिलीप जोगे, बबन नामदेव कोहार, निर्मला तुकाराम खडाते हे ग्रा.पं. सदस्य म्हणून निवडून आले आहे. तसेच भाजप गटाच्या लक्ष्मी गोविंद पेठकर व प्रतिभा मानीक जोगे या विजयी झाल्या आहेत.विदर्भ राज्य आघाडीने खाते उघडलेहिंगणघाट : तालुक्यातील जांगोना ग्रामपंचायत येथे सरपंचपदाच्या निवडणुकीत विदर्भ राज्य आघाडीचे नितीन वाघ यांनी ७६४ मते घेत किशोर राऊत यांचा पराभव केला. किशोर राऊत ३९८ यांना मते मिळाली. नितिन वाघ यांच्या विजयाने तालुक्यात जांगोना ग्रामपंचायत सरपंचपद व सदस्यांच्या ९ जागा जिंकून विदर्भ राज्य आघाडीने येथे खाते उघडले आहे.विरूळसह सोरटा, रसुलाबाद येथे पिछेहाटरोहणा : नुकत्याच निवडणुका झालेल्या रोहणा नजीकच्या विरूळ (आकाजी), सोरटा व रसुलाबाद या आर्वी तालुक्यातील मोठ्या आणि राजकिय दृष्ट्या संवेदनशील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना या राष्ट्रीय पक्षांना एकाही ग्रामपंचायतमध्ये आपला उमेदवार सरपंचपदी निवडून आणता आला नाही. ही बाब या पक्षांची राजकीय पिछेहाटच दर्शवित असून स्थानिक पुढाऱ्यांना चिंतन करायला लावणारी आहे. विरूळ (आकाजी), रसूलाबाद व सोरटा ही आर्वी तालुक्यातील मोठी गावे आहे. या गावांतील प्रस्थापीत घराणी ही राजकीय जाण असणारी आहे. या परिसरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमावडा आहे. यापूर्वीच्या अनेक निवडणुकामध्ये येथील ग्रामपंचायती कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हातात असायच्या; पण नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील निकालानुसार सोरटा येथे शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता, विरूळ (आकाजी) येथे ‘आप’चा नवख्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता तर रसूलाबादमध्ये प्रहार या संघटनेचा कार्यकर्ता सरपंच म्हणून निवडूण आला आहे. एकाही ठिकाणी कॉँग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजपाला यश मिळाले नाही. एवढेच नव्हे तर निवडून आलेले तिन्ही गावातील सरपंच मोठ्या मताधिक्याने विजयी झाले हे विशेष. पूर्वीपासून हा ग्रामीण भाग कधी कॉँग्रेस तर कधी राकाँचा बालेकिल्ला राहीला. परंतु, मागील पाच-दहा वर्षात भाजपाचे कार्यकर्ते देखील निवडणुकीत विजयी झाल्याचे पहायला मिळत होते. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग या तिन्ही गावांच्या मधून गेला आहे. या तिन्ही गावातील अनेक शेतकऱ्यांना महामार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदला बºयापैकी विद्यमान भाजपा प्रणित शासनाने दिला आहे. एवढे असतानाही या गावातील मतदारांनी लहान-लहान राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांना विजयी करून प्रस्थापितांना मोठा धक्काच दिला आहे. त्वरीत उपलब्ध होणारा स्थानिक कार्यकर्ता, जिल्हा पातळीपर्यंतच्या कामात त्वरीत मदत करणारा आपल्या कौटूंबीक सुख-दु:खात सहज सहभागी होणारा आणि प्रसंगी सामाजिक तसेच सहकार्याची भुमिका ठेवणारा कार्यकर्ता कोण या बाबी या गावातील निवडणुकीनंतरच्या चर्चेतून प्रभावी ठरल्याचे ऐकायला मिळत आहे.बोरगावात ‘देवतारी त्याला कोण मारी’चा प्रत्ययवर्धा : बोरगाव (मेघे) येथे सरपंच म्हणून संतोष सेलूकर विजयी झाले. विशेष म्हणजे त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या सख्ख्या भागालाच त्यांच्या विरोधात उभे केले होते.सिरसगांव (ध.) येथे काँग्रेसचा झेंडावायगाव (नि) - नजिकच्या सिरसगांव (धनाडे) येथील ग्रा.पं.वर काँग्रेसने सत्ता मिळविली आहे. मागील काही वर्षांपासून येथे काँग्रेसचे कार्यकर्ते उघडे यांच्या गटाचे वर्चस्व असून यंदाही वर्चस्व कायम राहिले आहे. शुभांगी अमोल उघडे या सरपंच म्हणून विजयी झाल्या. तर ग्रा.पं. सदस्य म्हणून निखिल कामडी, नलिनी चौधरी, रवींद्र तिनघसे, विठ्ठल उघडे, माधुरी शिंगाडे, करुणा नगराळे या विजयी झाल्या. तर राकाँच्या रुपाली कोडापे, अर्चना बा. पोळ, संकेत अ. निस्ताने हेही विजयी झाले आहेत.दारोडा ग्रा.पं.वर भाजपचे वर्चस्वदारोडा - हिंगणघाट तालुक्यातील ग्रा.पं. दारोडा येथे भाजपप्रणित आघाडीने विजय मिळविला आहे. येथे पूर्वी काँग्रेसची सत्ता होती. आकाश पोहाणे गटाने काँगे्रसच्या दिग्गजांना मागे टाकले आहे. सरपंच म्हणून गिरधर सिडाम हे निवडून आले आहेत. तर सदस्यपदी आकाश पोहाणे, संदीप झाडे, चिंधूजी कांबळे, रवी लाजूरकर, मंजूषा शिवणकर, अन्नपूर्णा मेश्राम, सविता अवचट यांनी विजय मिळविला.माळेगाव (काळी) येथे राजकीय उलथापालथकारंजा (घा.) - तालुक्यातील माळेगाव (काळी) येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजप प्रणित गटांच्या सरपंच सविता कालोकारसह चार सदस्यांनी संख्याबळासह ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकविला. यातच या निवडणुकीत काँग्रेस प्रणित गटातर्फे निवडून आलेल्या अर्चना प्रमोद हिवराळे यांनी त्याचे पती प्रमोद भगवान हिवराळे यांच्यासह माजी आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते रितसर भाजपात प्रवेश घेतला. त्यामुळे आता माळेगाव (काळी) येथील भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची संख्या ५ झाली आहे. तसेच या गावातील काँग्रेसचे पुढारी रामदास गोविंद आगदे, रामकिशन चंपतराव खंडाते आणि गंगाधर खराटे यांनीही भाजपात प्रवेश घेतला. यावेळी गुणवंतराव घागरे, रामदास गळहाट, भाऊराव कालोकार, सविता कालोकार, ज्योती पेंदाम, मालाबाई उईके, प्रविण चौधरी, मारोती कालोकार, दशरथ गाखरे, यादवराव डोंगरे, सुरेश कालोकार, प्रदीप बननगरे, संदीप पेंदाम, बाबुलाल चौधरी, चंद्रकांत कडवे, रोशन सपकाळ, संजय उईके आदींची उपस्थिती होती.गौळ ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यातवर्धा - देवळी तालुक्यातील गौळ हे गावा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मोरेश्वर खोडके यांचे गाव असून या गावातील ग्रामपंचायतीवर त्यांच्या काँग्रेस समर्थित पॅनलला बहूमत मिळाले आहे. ९ सदस्यांपैकी सरपंचासह सहा सदस्य विजयी झाले आहे.सरपंच पदाकरिता झालेल्या तिहेरी लढतीत मिलिंद मोरेश्वर खोडके यांनी अमोल शंकरराव कसनारे यांचा २३७ मतांनी पराभव केला.सरपंच पदाकरिता मिलिंद खोडके, अमोल कसनारे व मारोती लोहवे असे तीन उमेदवार रिंगणात होते.वॉर्ड क्रमांक १ मधून रमेश भोयर, रंजना इरपाते व हर्षदा कडू तर वॉर्ड क्रमांक २ मधून मनोज नागपूरे, ज्ञानेश्वर राऊत व अर्चना अलोणे हे खोडके गटाचे उमेदवार सदस्य म्हणून निवडून आले.तर वॉर्ड क्रमांक तीन मधून विरोधी गटाचे त्रिवेणी वाघमारे, वनमाला मून व भीमराव कांबळे हे तीन सदस्य विजयी झाले. काँग्रेस समर्थित खोडके गटाला बहूमत मिळाल्याने विजय उमेदवारांनी जल्लोष साजरा केला.
ग्रा.पं.च्या निकालानंतर ‘कही खुशी कही गम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:59 PM
जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहे. यात भाजप, काँग्रेस, राकाँ, शिवसेना, भाजप आदी पक्षाच्या पॅनलला मतदारांनी संमिश्र कौल दिला असल्याचे चित्र दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना मतदारांनी बहुमत दिले आहे.
ठळक मुद्देकाँग्रेस व भाजपाला समिश्र कौल : काही अपक्ष उमेदवारांनाही मिळाले मतदारांकडून बहुमत