शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

सेवानिवृत्तीनंतरही ‘ते’ देतात इंग्रजीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:28 PM

ज्ञानदानाने स्वत:च्या ज्ञानातही भर पडते. शिवाय गरजू, गरीब चिमुकल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचा लळाही लागेल, या उद्देशाने एक व्यासंगी मुख्याध्यापक निवृत्तीनंतरही ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे.

ठळक मुद्देध्येयवेडे गोपाळ घाडगे : गावात जाऊन गरजू विद्यार्थ्यांना अध्यापन

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : ज्ञानदानाने स्वत:च्या ज्ञानातही भर पडते. शिवाय गरजू, गरीब चिमुकल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचा लळाही लागेल, या उद्देशाने एक व्यासंगी मुख्याध्यापक निवृत्तीनंतरही ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे. त्यांचे हे कार्य इतरांना पे्ररणादायी असेच आहे.सोहमनाथ विद्या मंदिर उमरी शाळेत शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या गोपाळ घाडगे यांनी निवृत्तीनंतरही ज्ञानदानाचे काम सुरू ठेवले आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मूळ गाव लिंगा (मांडवी) येथे जाऊन विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे देण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी ते विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क घेत नाही. इंग्रजीमध्ये प्राविण्य असलेले घाडगे यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग गावातील विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून नि:शुल्क इंग्रजी शिकविणे सुरू केले. या शिकवणी वर्गात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतची गावातील सर्व मुले-मुली उपस्थित राहतात. त्यांच्या इंग्रजी विषयाच्या शिकवणीमुळे विद्यार्थ्यांत इंग्रजी विषयाची भीती, न्यूनगंड पूर्णत: नष्ट झाला आहे. असे म्हणतात की, निवृत्तीपर्यंतच आपले शिकविण्याचे काम आहे; पण घाडगे यांच्यासारखे ध्येयवेडे शिक्षणप्रेमी सामाजिक बांधिलकी जपतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबाबत असलेली तळमळ कुरवाळत त्यांनी मार्गदर्शन करणे सुरू ठेवले आहे. त्यांचा हा व्यासंग कौतुकास पात्र ठरतोय.शाळांना देतात भेटीघाडगे हे स्वत: शाळांना भेटी देत इंग्रजी विषयाचे वर्ग घेतात. तेव्हा वर्गातील विद्यार्थीही मंत्रमुग्ध होतात. आजपर्यंत त्यांच्या हातून बरेच विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन विद्याविभूषित झालेत. आजच्या शिक्षणाच्या खासगीकरणाच्या युगात घाडगे यांच्यासारख्या शिक्षकांची समाजाला गरज आहे.