शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

तीन वर्षांनंतरही इमारत अपूर्णच

By admin | Published: April 13, 2016 2:23 AM

तीन वर्षांपूर्वी सेलू येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकामाला सुरुवात झाली.

बांधकामाचा दर्जा तपासण्याची गरज : कंत्राटदारावरील भुर्दंड पोहोचला तीन लाखांवरघोराड : तीन वर्षांपूर्वी सेलू येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकामाला सुरुवात झाली. रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी रुग्णालयाच्या परिसरातच वास्तव्यास असल्यास रुग्णांना तात्काळ सेवा देता येईल हा यामागील उद्देश होता. पण तीन वर्ष लोटूनही सदर बांधकाम अपूर्णच आहे. त्यामुळे बांधकाम पूर्ण होण्यास अजून किती वेळ लागेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थान बांधकामाला ३० मार्च २०१३ ला सुरुवात झाली. त्यानंतर २६ दिवसांनी २६ एप्रिल २०१३ रोजी तत्कालीन राज्यमंत्री रणजीत कांबळे यांचे हस्ते तत्कालीन आमदार सुरेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली या बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला. आधी बांधकामाला सुरुवात आणि नंतर भूमिपूजन असे सेलूत सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रथमच केले असावे. या बांधकामासाठी ३४९.१५ लक्ष रूपयाच्या निधीची प्रशासकीय मान्यता असून ३१५.२५ लक्ष रूपयाची तांत्रिक मान्यता आहे. २९९.७३ लक्ष रूपयाचा करारनामा करण्यात आला. फलकावर काम सुरू झाल्याची तारीख ३०/३/१३ आहे. येथून १३ महिन्यात संबंधीत कंत्राटदाराला सदर काम पूर्ण करणे बंधनकारक होते. पण तीन वर्षाचा कालावधी लोटूनही काम अपूर्णावस्थेत असून ते लवकर पूर्ण होईल याची तिळमात्र शंका नाही. या बांधकामाची कासव गती असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने याआधीचही प्रकाशित केले होते. त्यावेळी उपविभागीय अभियंता डी. डब्ल्यू. कुटे यांना विचारणा केली होती. तेव्हा काम पूर्ण करण्याचा कालावधी संपला आहे. तेव्हापासून दररोज ५०० रुपये प्रमाणे दंडाची आकारणी संबंधीत कंत्राटदारावर करणे सुरू आहे, असे सांगितले होते. पण अजूनही काम पूर्ण झाले नसल्याने या कंत्राटदारावर जवळपास तीन लाखांच्या वर भूर्दंड बसल्याचे सांगण्यात येत आहे. अजून सहा महिन्यांचा काळ या बांधकामाला लागल्यास ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर कंत्राटदाराकडून दंडाची रक्कम वसूल केली जाणार काय, हे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. कामाची संथगती हादेखील संशोधनाचा विषय ठरत आहे. वेळेत काम पूर्ण व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेतच पावले उचलणे गरजेचे होते. पण दुर्लक्ष केल्यानेच ही परिस्थिती ओढावल्याचे दिसून येत आहे.(वार्ताहर)