लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : दिलीप बिल्डकॉन कंपनीच्यावतीने चार पदरी रस्त्यासाठी मुरूमाची नियमबाह्य वाहतूक सुरू असल्याने ग्रामीण रस्त्याची दैनावस्था झाली आहे. याबाबत योग्य कार्यवाहीसाठी ग्रामसभेत ठराव घेवून तो संबंधितांना पाठविण्यात आला; पण कुठलीच कार्यवाही करण्यात न आल्याने शनिवारी संपप्त दिघीवासियांनी गावातील मुख्य चौकात मुरुम भरलेली आठ जड वाहने रस्त्यात अडवून ठिय्या दिला. यावेळी सदर कंपनीच्या एका अधिकाऱ्याने आंदोलनकर्त्यांशी अरेरावी करण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.देवळी परिसरात दिलीप बिल्डकॉन कंपनीच्यावतीने चारपदरी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. यासाठी दिघी व बोपापूर भागातून मुरूमाची नियमबाह्य वाहतूक करण्यात येत आहे. दिघी ते देवळी या रस्त्याची क्षमता दहा टनाची असताना ३० टन मुरुम वाहनात भरून त्याची वाहतूक केली जात आहे. यामुळे रस्त्याची चाळीणी झाली आहे. शिवाय सदर जड वाहन गावातून भरधाव नेल्या जात असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत असल्याने ग्रामसभेत योग्य कार्यवाही व्हावी या हेतूने ठराव घेण्यात आला. तो ठराव संबंधितांना पाठवून बºयाच दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, त्याला केराची टोकली दाखवत असल्याचा आरोप करीत आज संतप्त ग्रामस्थांनी थेट मुरुम भरलेली वाहने अडवून आपला रोष व्यक्त केला.रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे एस.टी. बसही बंद होण्याच्या मार्गावर आहे. या सर्व बाबी लक्षात घेवून सरपंच घनश्याम कांबळे, ग्रा.पं. पदाधिकारी व गावकऱ्यांनी याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना समज दिला होता. नियमबाह्य वाहतुकीत सुधारणा करण्याचे सांगितले होते. परंतु, अधिकाऱ्यांनी या सर्व प्रयत्नांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. आम्ही या परिसरात रितसर जमिनी, खरेदी केल्या आहेत. त्यामुळे पाहीजे त्या पद्धतीने उत्खन्न करून गौणखनिजांची वाहतूक करण्यास मोकळे आहोत, अशा प्रकारे दमदाटी करण्यात येत असल्याने संतप्त नागरिकांनी दिघा गावातील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.दुपारी ३ वाजताचे दरम्यान कंपनीचे चंद्रकांत शर्मा व पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांचे मध्यस्थीने तोडगा काढून आंदोलनाला तात्पूरती स्थगिती देण्यात आली. कंपनीचेवतीने डॅमेज रस्त्याची वेळोवेळी दुरुस्ती करण्याचे हमीपत्र देण्यात आले आहे.
बिल्डकॉन कंपनी विरोधात दिघीवासीय रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:06 AM
दिलीप बिल्डकॉन कंपनीच्यावतीने चार पदरी रस्त्यासाठी मुरूमाची नियमबाह्य वाहतूक सुरू असल्याने ग्रामीण रस्त्याची दैनावस्था झाली आहे. याबाबत योग्य कार्यवाहीसाठी ग्रामसभेत ठराव घेवून तो संबंधितांना पाठविण्यात आला; ........
ठळक मुद्देमुरुम भरलेली वाहने अडविली : अधिकाऱ्यांकडून अरेरावी