पुतळ्याला घातला चपलांचा हार : आर्वी, समुद्रपूर व हिंगणघाटमध्ये आंदोलन लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी/समुद्रपूर/हिंगणघाट : भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट येथे आंदोलन केले. दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचे हार घालून त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. आर्वी येथे रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश देशमुख, उपतालुका प्रमुख कैलास इखार, शेखलाल जाधव, सहसचिव मनीष अडसड, मंगेश डाखोळे, सुमित बिजवे, निलेश बंगाले आदी उपस्थित होते. यावेळी दानवे यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. समुद्रपूर येथे दानवे यांनी तूर उत्पादकांबाबत काढलेल्या अपशब्दाचा निषेध नोंदविण्याकरिता झेंडा चौकात गुरुवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलात दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला, जोडे मारण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण ही चिंतनाची बाब आहे. यावर राज्यसरकार कुठलीही ठोस उपाययोजना आखण्याची तयारीही दाखवत नाही. यातच दानवे यांचे विधान शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करीत शिवसेना समुद्रपूर तालुक्याच्यावतीने तिव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. याप्रसंगी तालुकाप्रमुख रवींद्र लढी, प्रमोद घटे, पं.स. सदस्य गजानन पारखी, देविदास वैद्य, युवा सेनेचे सुरज सोनटक्के, मोरेश्वर धोटे, गजानन बोरेकरसह यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. हिंगणघाट येथील कारंजा चौकातही शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भारत चौधरी यांच्या नेतृत्वात रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. याप्रसंगी शहर प्रमुख मुन्ना त्रिवेदी, प्रकाश अनासने, नगरसेवक श्रीधर कोटकर, शंकर मोहमारे, युवासेनेचे पदाधिकारी प्रकाश घोडे, रमेश चतुर, चंदू पंडित, प्रमोद नौकरकर, विनोद चाफले, राजू आंबटकर, विनोद जंबलेवार, पिंटु बैसवारे, सुखदेव थुटरकर, महेश खडसे, दिलीप चौधरी, संजय पिंपळकर, निखील झिबड, भारत तामटे, सुखदेव कुबडे, संजय सयाम, छत्रपती वादाफळे, प्रवीण वांढरे, सुशिल शर्मा, मन्ना काशीनिवास, विजय माहुरे, मारोती बोरकर, बंडु बैस, अरविंद राऊत, मोरेश्वर खोकले आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या या अपमानाबाबत शिवसैनिक तसेच नागरिकांनीही तीव्र संताप व्यक्त केला.
रावसाहेब दानवेंच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर
By admin | Published: May 12, 2017 12:57 AM