लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळीच्या दुसºया दिवसापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. शिवाय रविवारी पहाटेच्या सुमारास आणि सायंकाळी अचानक पावसानेही हजेरी लावली. पुन्हा आलेल्या या ढगाळी वातावरण आणि पावसामुळे शेतकºयांत चांगलीच धडकी भरल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. यात सर्वाधिक भीती कापूस उत्पादकांना असून त्यांचा कापूस शेतातच ओला तर होणार नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.गत आठवड्यात आलेल्या परतीच्या पावसाने शेतकºयांच्या तोंडचा घास हिसकला आहे. शेतात सोयाबीन सवंगणीच्या स्थितीत असताना आलेला पाऊस सोयाबीनची माती करून गेला. या पावसाने शेतात असलेल्या कपाशी पिकाचेही मोठे नुकसान केले आहे. झाडावरच कपाशीची बोंडे सडल्याने कापूस उत्पादकांना मोठा फटका बसला. तर असलेल्या दमट वातावरणामुळे ओला झालेल्या कापसातील सरकीलाही अंकूर फुटल्याचे दिसून आले. याचा फटका कापूस उत्पादकांना बसला आहे. आता पुन्हा ढगाळी वातावरण असून पाऊस आल्यास कापूस उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता आहे.कापसाची बोंडे झाडावरच सडण्याची भीतीदिवाळीच्या पूर्वी आलेल्या पावसामुळे शेतात असलेल्या कपाशीची बोंडे झाडावरच काळी पडून सडली होती. काही भागात ओल्या झालेल्या कापसातील सरकीला अंकुर फुटले होते. या स्थितीत बºयाच शेतकºयांनी त्यांच्याकडे असलेला कापूस बाजारात आणला. बाजारात आणलेला हा कापूस ओला असल्याच्या कारणाने व्यापाºयांकडून त्याला अत्यल्प दर दिल्या जात आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना याचा चांगलाच फटका बसत आहे. या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. यात आता पुन्हा ढगाळी वातावरण आणि पावसाची चिन्हे दिसू लागली आहेत. याचा फटका कापूस उत्पादकांना बसण्याचे संकेत दिसत आहे.बाजारात आलेले सोयाबीन ओले असल्याने दर पडलेसोयाबीन बाजारात काढून मिळणाºया रकमेतून दिवाळी साजरी करण्याचा शेतकºयांचा मानस होता. मात्र आलेल्या परतीच्या पावसामुळे अनेक शेतकºयांचे सोयाबीन शेतातच ओले झाले. तर काही भागात ओल्या झालेल्या सोयाबीनला अंकूर फुटले. याचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला. पावसापासून उसंत मिळताच शेतकºयांनी सोयाबीन वाळवून त्याची काढणी केली. पावसाच्या काळामुळे शेतकºयांना सोयाबीन वाळविण्याकरिता वेळ मिळाला नसल्याने त्याने तसेच सोयाबीन बाजारात नेले. हे सोयाबीन पाहून व्यापाºयांनी ते ओले असल्याचे म्हणत त्याला अत्यल्प दर दिला. यामुळे शेतकºयांची मोठी अडचण झाल्याचे दिसून आले आहे.
ढगाळी वातावरणाने शेतकºयांत धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:47 AM
दिवाळीच्या दुसºया दिवसापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. शिवाय रविवारी पहाटेच्या सुमारास आणि सायंकाळी अचानक पावसानेही हजेरी लावली.
ठळक मुद्देकापूस उत्पादक चिंतेत : पहिल्या पावसाने सडली बोंडे; सोयाबीनही ओलेच