घोराड : सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. परंतु गाव खेड्यात कृषी सहायकांचे दर्शन दुर्लक्ष झाल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. तालुका कृषी विभागांतर्गत सेलू व सिंदी अशी दोन मंडळ आहे. सेलू मंडळांतर्गत बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. कपाशी लागवडीला वेग आला असून सोमवारपासून मृग नक्षत्राला सुरुवात होत आहे. याच नक्षत्रात कपाशी व सोयाबीनची पेरणी केली जाते. शेतकऱ्यांना याचवेळी मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे मंडळ अधिकारी कार्यालयात चकरा मारत असले तरी कार्यालयात कृषी सहायक मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत आहे. परंतु या कार्यालयात विचारणा केली असता कृषी सहायक दौऱ्यावर गेल्याचे सांगीतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकांना शोधण्याची वेळ आली आहे. काही कृषी सहायकांनी मात्र शेतकऱ्यांना संपर्क क्रमांक दिल्याने काही गावचे कृषी सहाय्यकाची भेट होत असल्याचे शेतकरी सांगतात. पण हा भ्रमणध्वनी क्रमांक सर्वच शेतकऱ्यांजवळ उपलब्ध नाही. त्यामुळे अशांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे ते त्रस्त झाले आहे.(वार्ताहर)
कृषी सहायकांचे दर्शन दुर्लभ
By admin | Published: June 08, 2015 2:31 AM