लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : परिसरात गुलाबी बोंडअळीनंतर आता सोयाबीनवरील लष्करी व उंट अळीने हल्ला चढविला आहे. यामुळे कपाशीनंतर आता सोयाबीनचे पिकही धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सोयाबीनवर लष्करी अळीचा हल्ला झाल्याने सोयाबीनचे पीक नष्ट होत असल्याची तक्रार शेतकऱ्याने केल्यानंतर कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. तसेच शेतकºयांशी संवाद साधून उपाययोजनाही सुचविल्या.नारायणपूर येथील शेतकरी युवराज सावरकर यांच्या पाच एकरातील सोयाबीन पिकांवर लष्करी अळीने हल्ला चढवून पीक नष्ट केले. याची तक्रार केल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृ षी अधिकारी विद्या मानकर यांनी दखल घेत लगेच युवराज सावरकर यांचे शेत गाठून पाहणी केली. यावेळी सोयाबीन पिकावर उंट व लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळुन आला. या दोन्ही अळ्यांनी या सोयाबीन पिकांचे पुर्णत: नुकसान केल्याचे दिसून आले.लष्करीअळीच्याा उत्पत्तीने शेतकरी हैराणलष्करी अळीचे जीवनचक्र ३०-३५ दिवसाचे असून या अळीचा एक पतंग एका वेळी ५०० अंडी टाकु शकतो.लष्करी अळी ही झाडाचे खालची पाने खाण्यापासून सुरुवात करते, ज्यातुन ४-५ दिवसात अळ्या बाहेर येतात. ही अळी दिवसभर जमिनीवर असते तर रात्री नुकसान करण्यास सुरुवात करते. त्यामुळे फवारणीचा परिणाम होत नाही.जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले सोयाबीनचे पीकसमुद्रपूर तालुक्यात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तालुक्यातील अधिकाºयांची बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विद्या मानकरही उपस्थित होत्या. यावेळी नारायणपूर येथील शेतकरी युवराज सावकर यांनी लष्करी अळीने फस्त केलेले सोयाबीनचे काही झाडे उपडून आणून जिल्हाधिकाऱ्यांना दाखविले. त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन लगेच अधिकारी सावकर यांच्या शेतात पोहोचले.त्यावरील उपाययोजनासोयाबीनचे पीक फुलावर येण्यापुर्वी ३-४ अळ्या प्रतिमीटर ओळीत आढळल्यास क्विनालफॉस २५ टक्के २० मि.ली. किवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के १५ ग्रँम किवा प्रोफेनोफॉस ५० टक्के २५ मि.ली, किवा स्पिनोसँड ४५ एस.पि.४ मि.ली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी किवा इंडोक्साकार्ब १५.८ एस.सी.हे औषध ६.६ मिली १० लिटर पाण्यात मिळुन फवारणी करावे. शेताच्या सभोवताल तण असल्यास ते काढुन टाकावे.लष्करी अळीच्या नियंत्रणाकरीता अवाजवी व महागडे औषध वापरण्याची गरज नाही. असे कृषि अधीक्षक मानकर यांनी सांगितले. सोबतच घरगुती तयार होणाºया अळीनाशक औषधाचे मिश्रण तयार करण्याचा सल्ला दिला.
पीक पाहणीसाठी कृषी अधिकारी बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:51 IST
परिसरात गुलाबी बोंडअळीनंतर आता सोयाबीनवरील लष्करी व उंट अळीने हल्ला चढविला आहे. यामुळे कपाशीनंतर आता सोयाबीनचे पिकही धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
पीक पाहणीसाठी कृषी अधिकारी बांधावर
ठळक मुद्देशेतकऱ्यांशी संवाद : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी सुचविले उपाय