शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बसस्थानकावर विमानतळासारख्या सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:38 PM

विमानाने दररोज १ लाख लोक प्रवास करीत असून त्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. विमानातून प्रवास करताना अनेकदा विमानतळावर दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा डोळ्यात भरायच्या. बसने प्रवास करणाऱ्या सामान्य कष्टकरी ६८ लाख लोकांना मात्र अशा सुविधेचा अभाव आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : सेलूच्या बसस्थानकाची पायाभरणी, विविध विकासकामांचा श्रीगणेशा

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : विमानाने दररोज १ लाख लोक प्रवास करीत असून त्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. विमानातून प्रवास करताना अनेकदा विमानतळावर दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा डोळ्यात भरायच्या. बसने प्रवास करणाऱ्या सामान्य कष्टकरी ६८ लाख लोकांना मात्र अशा सुविधेचा अभाव आहे. यामुळे महाराष्ट्राच्या कष्टकरी ग्रामीण भागातील जनतेलाही विमानतळासारख्या सुविधा मिळाव्यात म्हणून अर्थमंत्री होताच बसस्थानकाला निधी देण्यावर भर दिला आहे. आज ६५९ पैकी १७५ बसस्थानकाचे काम सुरु झाले असल्याचे मत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.सेलू येथील नवीन बसस्थानक आणि सेलू-हिंगणी- हिंगणा या रस्त्याची पायाभरणी करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर,माजी खासदार सुरेश वाघमारे, सेलू पंचायत समितीच्या सभापती जयश्री खोडे, सेलूच्या नगराध्यक्ष शारदा माहुरे, जिल्हा परिषदेच्या सभापती सोनाली कलोडे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक महेंद्र नेवारे, खांडेकर यांची उपस्थिती होती. यावेळी वृक्ष लागवड करताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम चांद्यापासून बांद्यापर्यंत राबवताना जेव्हा-जेव्हा झाड लावले तेव्हा पावसाची कृपा झाली. आजही आमच्या चार कार्यक्रमावर पाणी फेरले तरी चालेल. पण भरभरुन बरसून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ दे, अशी प्रार्थना ना.मुनगंटीवार यांनी केली.तसेच आज प्रत्येक गाव शहराच्या मुख्यमार्गाला जोडल्या गेल्याने विकास साधला गेला. यामध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोलाचा वाटा आहे. स्व.प्रमोद शेंडे यांची आठवण करत बजाज चौक ते शिवाजी चौक रोड बांधला गेला होता. आता नॅशनल हायवेच्या माध्यमातून या विकासात भर घातली आहे. असे खासदार रामदास तडस यांनी सांगितले. सेलुच्या बसस्थानकावर सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी अडचण व्हायची. परंतु आता सर्व सुविधायुक्त बसस्थानकाची निर्मिती होऊन विद्यार्थ्यांसह नागरिकांच्याही अडचणी सुटणार आहे. सोबतच बाहेरुन जाणाऱ्या बसही आता शहरातून सुरु करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचा शब्द ना. मुनगंटीवार यांनी दिल्याचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमापूर्वी अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याहस्ते सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत वरुड येथील रस्ते, नाल्या, विद्युतीकरण व सौदर्यीकरणाच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.वर्ध्याला देणार ५० नवीन बसगाड्याराज्य परिवहन महामंडळाच्या भंगार गाड्या असल्याची ओरड होत असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता वर्ध्यातील प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी ५० नव्या कोºया बसगाड्या देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. वर्ध्यांतील नवीन बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, आ. डॉ. पंकज भोयर, आ. अनिल सोले, नगराध्यक्ष तराळे उपस्थित होते. लाल दिव्यापेक्षा लाल रक्ताचे नाते महत्वाचे आहे. या जिल्ह्याने मला भरपूर प्रेम दिले. मंत्री पद येत जात असतात. पण नातं कायमच राहत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर विचित्र अशा पोस्ट व्हायरल होत आहे. कदाचित व्हॉट्सअ‍ॅपच्या निर्मात्याने या पोस्ट बघितल्या असत्या तर सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली असती, असे ते म्हणाले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार