लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत) : भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने मंगळवारी सकाळी येथील क्रिकेट अकॅडमी तथा सीबीएसई शाळेला भेट दिली. शाळेच्या मैदान व परिसरात सुमारे दोन तास थांबून त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांसोबत संवाद साधला. शाळेच्या संचालिका डॉ. नीता अढाऊ, क्रिकेट अकॅडमीचे संचालक रोमी भिंडर तसेच प्रशिक्षक विक्रम यांनी त्यांचे स्वागत केले.आपली येथे येण्याची बरेच दिवसांपासून इच्छा होती. यावेळी नागपूर येथील सामन्यामधून वेळ मिळाल्याने मी येथे आलो. येथील एकंदरीत वातावरण पाहून मला माझ्या लहानपणाची आठवण झाली. मी अशाच वातावरणातून पूढे गेलो आणि रोमी भिंंडर तसेच त्याच्या सहकाºयांसोबत राहून माझे कौटुंबिक संबंध तयार झाले. यामुळे जणू मी आपल्या घरीच आलो असे वाटत असल्याचे भावनिक उद््गार रहाणे यांनी काढले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना रहाणे म्हणाला की, आपल्या गुरूजणांचा आदर करा, सन्मान करा, ते जे शिकवितात ते काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आपण जीवनात जे ध्येय ठरविले, त्यामध्ये आपल्याला अनेक आव्हानेही असतात; पण त्यालाही सामोरे जा. मागे वळून पाहु नका. जीवनात चॅलेंज असल्याशिवाय ध्येय गाठता येत नाही. हे मी सुद्धा अनुभवले म्हणून पूढे जाण्याचा प्रयत्न करा, यश नक्कीच तुमच्या पदरी पडेल, असे सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.आपल्या घरी जसे वातावरण असते तसाच काहीसा भास मला येथे प्रवेश केल्याबरोबर झाला. असे वातावरण कमी ठिकाणी मिळते. म्हणून मी येथील विद्यार्थी व शिक्षकांचे मनोबल उंच ठेवण्याकरिता पुन्हा नक्कीच येईल, अशी ग्वाही दिली.याप्रसंगी भारतीय क्रिकेट संघाचे टि-शर्ट आर्वीेचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक कपील ठाकुर यांना देत रहाणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला अमरावती येथील क्रिकेट असो.चे सचिव दिनानाथ नवाथे, जिल्हा क्रिकेट असो. चंद्रपूरचे शैलेंद्र भुयार, वर्धा येथील अविनाश वंजारी, माजी आमदार दादाराव केचे, डॉ. कोल्हे, डॉ. रिपल राणे, कपील निर्गून आदी उपस्थित होते.
तळेगावच्या क्रिकेट अकादमीला अजिंक्य रहाणे यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:04 AM
भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने मंगळवारी सकाळी येथील क्रिकेट अकॅडमी तथा सीबीएसई शाळेला भेट दिली.
ठळक मुद्देभारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज अजिंक्य रहाणे