लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : उधारीचे १०० रुपये दे असे म्हणत सुरू झालेला शाब्दीक वाद विकोपाला जाऊन वादाचे हाणामारीत रुपांतरण झाले. यावेळी आरोपींनी लाठी-काठी व चाकूने वसंता शिवदास थुल (५९) रा. येसंबा याला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमी वसंताला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना नजीकच्या येसंबा येथे घडली असून तिघांना सेवाग्राम पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी दोघांवर यापूर्वीही दारूविक्रीसह गंभीर स्वरूपाचे इतर गुन्हे दाखल आहेत, हे विशेष.प्राप्त माहितीनुसार, आकाश सुनील पाटील याने उधारीचे १०० रुपये मागितले. त्यावरून सुरूवातीला वसंता थूल व आकाश पाटील, बादल पाटील, सोनू उर्फ स्वप्नील दुपट्टे, कैलास जुनघरे, राजू दुपट्टे तसेच मंजू पाटील यांच्यात चांगलाच शाब्दीक वाद झाला. दरम्यान हा वाद विकोपाला जाऊन आकाश, बादल, स्वप्नील, कैलास, राजू व मंजू यांनी वसंता थूल याला लाठी-काठी व चाकूने मारहाण केली. यात वसंता हा गंभीर जखमी झाला. जखमीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी प्रतीक वसंत थूल याच्या तक्रारीवरून बादल पाटील, आकाश पाटील, सोनू उर्फ स्वप्नील दुपट्टे, कैलास जुनघरे, राजू दुपट्टे व मंजू पाटील यांच्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी बादल पाटील, आकाश पाटील व सोनू उर्फ स्वप्नील दुपट्टे याला सेवाग्राम पोलिसांनी अटक केली आहे. तर एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सेवाग्रामचे ठाणेदार संजय बोठे करीत आहेत.आरोपी आकाश अन् बादल दारूविक्रेतेया प्रकरणातील तीन आरोपींना सेवाग्राम पोलिसांनी हूडकून काढत अवघ्या काही तासात अटक केली आहे. तर मुख्य आरोपी असलेल्या बादल पाटील व आकाश पाटील यांच्याविरुद्ध यापूर्वी दारूविक्री आणि गंभीर स्वरूपाचे इतरही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
येसंबा येथे दारूविक्रेत्यांनी केली एकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 9:30 PM
उधारीचे १०० रुपये दे असे म्हणत सुरू झालेला शाब्दीक वाद विकोपाला जाऊन वादाचे हाणामारीत रुपांतरण झाले. यावेळी आरोपींनी लाठी-काठी व चाकूने वसंता शिवदास थुल (५९) रा. येसंबा याला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमी वसंताला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
ठळक मुद्दे१०० रुपयांचा वाद गेला विकोपाला