शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वाहनांचे ‘अलायमेंट’ बिघडले अन् आता ‘अ‍ॅव्हरेज’ ही घटला,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 5:00 AM

चारचाकी वाहनांना दर ५ हजार किलो मीटर प्रवास झाल्यावर अलायमेंट आणि बॅलेंसिगची गरज असते. बरीच वाहने आता अलायमेंट व बॅलेंसिंगवर आली आहे. बऱ्याच वाहनांची ऑईल काळे आले असून त्यांच्या सर्व्हिसिंगची गरज आहे. पण, सर्व्हिसिंग सेंटरच बंद असल्याने वाहने खिळखिळे होऊन अ‍ॅव्हरेजही घटला. परिणामी पेट्रोलचा खर्च वाढल्याने अनेकांनी आता वाहने घरातच उभी करुन ठेवल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन इफेक्ट : व्यवसायही ठप्प, आहे त्या परिस्थितीत दे धक्का!

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : माणसाचे जीवन चक्राप्रमाणे गतिमान झाले असून या धावपळीत वाहनांचा मोठा आधार मिळत आहे. त्यामुळे माणसांच्या आरोग्यासोबतच वाहनांचेही आरोग्य जपण्यासाठी त्यांची नियमित सर्व्हिसिंग होणे आवश्यक आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून सर्व दुकाने बंद असल्याने सध्या वाहनांचे ‘अलायमेंट’ बिघडले अन् ‘अ‍ॅव्हरेज’ ही घटला आहे. पण, पर्याय नसल्याने आहे त्याच परिस्थितीत वाहन चालकांचा दे धक्का सुरु आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटीमध्ये जिल्ह्यात १५ मे पासून लॉकडाऊन करण्यात आला. सुरुवातीला अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने तेव्हापासून दुचाकी व चारचाकी वाहनांचे सर्व्हिसिंग सेंटर आणि चारचाकी वाहनांचे अलायमेंट व बॅलंसिंग सेंटर बंद करावे लागले. सध्या लॉकडॉऊन असल्यामुळे टॅक्सीचाही व्यवसाय अडचणीत आल्याने बºयाच वाहनचालकांनी आपली वाहने शासकीय कामात लावली आहे. तर काहींची वाहने अद्यापही अत्यावश्यक सुविधांच्या नावाने रस्त्यांवर धावतांना दिसत आहे. वाहने धावत असल्याने त्यांच्यामधील ऑईल नियमित बदलवून वाहनांची सर्व्हिसिंग करणे आवश्यक असते. यासोबतच चारचाकी वाहनांना दर ५ हजार किलो मीटर प्रवास झाल्यावर अलायमेंट आणि बॅलेंसिगची गरज असते. बरीच वाहने आता अलायमेंट व बॅलेंसिंगवर आली आहे. बऱ्याच वाहनांची ऑईल काळे आले असून त्यांच्या सर्व्हिसिंगची गरज आहे. पण, सर्व्हिसिंग सेंटरच बंद असल्याने वाहने खिळखिळे होऊन अ‍ॅव्हरेजही घटला. परिणामी पेट्रोलचा खर्च वाढल्याने अनेकांनी आता वाहने घरातच उभी करुन ठेवल्याचे दिसून येत आहे.

ना पंक्चर दुरुस्तीचे सोय, ना हवा भरण्याचीn‘घरात रहा...सुरक्षित रहा...’ असे आवाहन करुन शासनाने लॉकडाऊन केला आहे. पण, अत्यावश्यक सुविधा तसेच इतर महत्वांच्या कामाकरिता नागरिकांना घराबाहेर पडावे लागत असल्याने वाहनांची आवश्यक पडत आहे. परंतु सध्या ना पंक्चर दुरुस्तीची सोय आहे ना हवा भरण्याची. त्यामुळे काहींनी वाहने उभी करुन सायकलीचा आधार घेत आहे तर काही कमी हवेतही वाहने दामटविताना दिसत आहे. ही बाब मात्र खऱ्या अर्थाने चारचाकी वाहनांकरिता फार अडचणीची ठरत आहे. 

वाहनचालकांसमोर अडचणी- सर्व्हिसिंगअभावी अ‍ॅव्हरेज घटला- वाहने खिळखिळी झाली- पंक्चर दुरुस्तीची कोणतीही सोय नाही- अलायमेंटअभावी टायरवर परिणाम- ऑईल बदलेले नसल्याने इंजिनला नुकसान- वाहनांचे कोणतेही पार्ट मिळणे नाहीच

माझे अलायमेंट आणि बॅलंन्सिंगचे काम असून पूर्वी दरदिवसाला दहा ते पंधरा वाहने यायची. दर पाच हजा किलोमीटर वाहन चालल्यानंतर अलायमेंट व बॅलंन्सिंग करणे आवश्यक असते. अन्यथा वाहनाचे टायर मार खातात.पण, आता सर्वच बंद असल्याने अलायमेंट व बॅलंसिंग करता येत नाही. परिणामी वाहनाचालकाला त्याचा फटका बसणार आहे. सोबतच आमची दुकाने बंद असल्याने आमच्याही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. माणिकचंद बारई, व्यावसायिक 

वाहनाचे नियमित अलायमेंट, बॅलंन्सिंग आणि सर्व्हिसिंग केले तर वाहनांचा अ‍ॅव्हरेजही चांगला असतो. त्यामुळे  वाहनचालवितांनाही काही अडचण जात नाही. पण, आता सर्वच बंद असल्याने वाहनांची सर्व्हिसिंग थांबले आहे. परिणामी अ‍ॅव्हरेजही घटला आहे. वाहन चालूच राहिले तर वाहनांच्या आयुर्मानावर परिणाम होईल आणि बंद ठेवले तर रोजीरोटीचा प्रश्न आहे.सुुहास वानखेडे, वाहन मालक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या