शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

‘त्या’ झोपड्या हटविण्याच्या ठरावाला सर्वानुमते मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 10:31 PM

आरंभा येथे जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी समीर देवतळे यांच्यावर चाकू व काठीने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त जमावाने या घटनेतील आरोपींच्या झोपड्या जाळण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देग्रामसभेत दिली हिरवी झेंडी : समीर देवतळे हत्या प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : आरंभा येथे जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी समीर देवतळे यांच्यावर चाकू व काठीने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त जमावाने या घटनेतील आरोपींच्या झोपड्या जाळण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पोलिसांच्या मध्यस्तीने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी ग्रा.पं. कार्यालयात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यात सदर झोपड्या हटविण्यात याव्या या एकमेव विषयावर चर्चा करून त्याला सर्वानुमते मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.आरंभा परिसरातील ज्या झोपड्या हटविण्याच्या विषयाला ग्रामसभेत मंजुरी मिळाली त्या झोपड्या परिसरात अवैध गावठी दारू निर्मिती केली जाते. शिवाय तेथूनच परिसरातील काही गावांना गावठी दारू पुरविली जाते. या दारूविक्रीच्या व्यवसायामुळे गावातील शांतता भंग होत आहे. शिवाय त्याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत असल्याचा ठपका ग्रामसभेत सदर विषयावर चर्चा करताना ठेवण्यात आला. गट-ग्रामपंचायत आरंभा-मांगलीच्यावतीने घेण्यात आलेल्या ग्रामसभेला सरपंच दुर्गा कुंभरे या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. तर ग्रामसेवक जी.व्ही ईखार (विहीरकर), ग्रा.पं.सदस्य कैलाश लढी, शंकर राखुंडे, तारा वानखेडे, अलका कुकडे, देवका भटे, पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून जमादार उमेश हरणखेडे, चेतन पिसे, वनविभागाचे प्रतिनिधी म्हणून वनरक्षक एस. एल. तिजारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी प्रमोद भटे, अशोक सुर्यवंशी, बाबा झाडे, संजय मांडवकर, हरीभाऊ हरडे, रामु लढी, शंकर हरडे, महादेव धोटे, अशोक देवतळे, ज्ञानेश्वर देवतळे, मदन जवादे, संतोष मोडक, श्रीहरी ऊचले, विनोद गोडघाटे, किसना वाकुलकर, दामोधर सपाट यांच्यासह शेतकरी व शेतमजुरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.दुसरा आरोपी पोलिसांपासून दूरचसमीर देवतळे हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला समुद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. त्याची न्यायालयाच्या आदेशावरून बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मृतक समीरवर हल्ला करणारे दोघे होते असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. दुसऱ्या आरोपीच्या शोधार्थ समुद्रपूर पोलिसांची चमु नागपूर, बुटीबोरी, बोरखेडी, चांदुरबाजार, जामणी, सेवाग्राम आदी ठिकाणी जाणून आली; पण त्याला जेरबंद करण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. लवकरच आरोपीला अटक करू, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा