लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : खरिपाची लगबग सुरु झाल्याने लॉकडाऊनच्या काळात पीककर्जाकरिता आवश्यक कागदपत्र मिळविताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे हंगामापूर्वी पीककर्ज मिळावे याकरिता शेतकऱ्यांना नो-ड्यूची सक्ती न करता मुद्रांकावर शपथपत्र लिहून घ्यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. असे असतानाही येथील अलाहाबाद बँकेने या आदेशाला केराची टोपली दाखवित, नो-ड्यू असल्याशिवाय पीककर्ज मिळणार नाही,असे फर्मान सोडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहेत.येथील अलाहाबाद बँकेत विजयगोपाल, तांभा (येंडे), सावंगी (येंडे), हिवरा-कावरे, मलातपूर, कोल्हापूर, रोहणी, चोंडी, हिरापूर, तळणी या गावातील शेतकऱ्यांचे व्यवहार आहे.आता शेतीचा हंगाम सुरु असल्याने शेतकऱ्यांनी पीककर्जाकरिता बँकेचे दार ठोठावले आहेत. आता कागदपत्रांची पूर्तता महसूल विभागाकडून होणार आणि नो-ड्यू ऐवजी शंभर रुपयाच्या मुद्रांकावरील शपथपत्रावर पीककर्ज मिळणार, अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण, बँक व्यवस्थापकाने आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलून पीककर्जाकरिता नो-ड्यू आणण्याची सक्ती केली आहे. व्यवस्थापकाच्या या मनमानी कारभारामुळे अद्याप एकाही शेतकऱ्याला पीककर्ज मिळाले नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने कृषी केंद्र चालकही उधारीवर बियाणे देण्यास तयार नाही.त्यामुळे आता पेरणी करायची कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बँकेने पीककर्ज देण्यास नकारघंटा सुरु ठेवली तर शेतकऱ्यांना नाईलाजास्तव सावकाराच्या दारात जावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत शेतकऱ्यांचा पीककर्जाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी होत आहेत. लॉकडाऊनमुळे यावर्षी बँकाचे कामकाजही पुर्णवेळ होऊ शकले नाही. मागील वर्षीचे कर्ज भरण्यास शासनाने मुदतवाढ दिली असली तरी नविन कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत गर्दी आहे.शेतकरी राष्ट्रीयकृत दोन-तीन बँकेकडून कर्ज घेत आहे. त्यामुळे तीन ते चार राष्ट्रीयकृत बँकेकडून शेतकऱ्यांना ना-हरकत प्रमाणपत्र आणावयास सांगितले जात आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना पीककर्ज देता येणार नाही.दीपक जैन, व्यवस्थापक, अलाहाबाद बँक, विजयगोपाल
अलाहाबाद बँकेकडून ‘नो-ड्यू’करिता तगादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 5:00 AM
आता शेतीचा हंगाम सुरु असल्याने शेतकऱ्यांनी पीककर्जाकरिता बँकेचे दार ठोठावले आहेत. आता कागदपत्रांची पूर्तता महसूल विभागाकडून होणार आणि नो-ड्यू ऐवजी शंभर रुपयाच्या मुद्रांकावरील शपथपत्रावर पीककर्ज मिळणार, अशी सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण, बँक व्यवस्थापकाने आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलून पीककर्जाकरिता नो-ड्यू आणण्याची सक्ती केली आहे.
ठळक मुद्देआदेशाला ठेंगा : एकाही शेतकऱ्याला पीककर्ज नाही