अमोल सोटे - आष्टी (श़)बालकांची कूपोषण मुक्ती व सुदृढ आरोग्यासाठी राज्य शासनाने ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांसाठी पुरक पोषण आहार सुरू केला; पण अंमलबजावणी करणारी यंत्रणा ढिसाळ आहे़ यामुळे कुपोषणाचा टक्का वाढत आहे़ जिल्ह्यात मुदत संपलेल्या आहाराचे वाटप केले जात आहे़ हे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या पाहणीत उघड झाले़ यामुळे धास्तावलेला बालकल्याण विभाग मुदत संपलेल्या पॉकीटांसाठी शोधमोहीम राबवित आहे़शालेय सत्र २०१४-१५ सुरू झाले़ सर्वच विद्यार्थी शिक्षणात व्यस्त झाले़ त्यांच्या आरोग्यासाठी सर्व शिक्षा अभियानातून योजना राबविल्या जातात़ यात महिला व बालकल्याण विभागाद्वारे ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांसाठी पुरक पोषण आहार पाठविण्यात आला़ यातील शिरा पॉकेटवर बॅच नंबर, उत्पादन दिनांक नाही तर शेकडो पॉकेटवर मुदत संपलेला दिनांक नमूद आहे़ पॉकेटवर उपयोगाचा अंतिम कालावधी उत्पादन तारखेपासून ४ महिने आहे; पण काही पॉकेटवर २०१० चे मार्कींग दिसून आले़ हे तपासण्याचे अधिकार अंगणवाडी पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) यांना आहे़ संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी केंद्रांना भेटी दिल्या; पण कुणालाही ही बाब दिसली नाही़ काही अंगणवाडी सेविकांनी अधिकाऱ्यांना माहिती देण्याची तयारी दर्शविली; पण त्यांच्यावर महिला बालकल्याण विभागाद्वारे कारवाई केली जाते़ यामुळे कुणीही पुढाकार घेत नाही़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़
मुदत संपलेल्या आहाराचे वाटप
By admin | Published: June 28, 2014 11:43 PM