शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना किसान विकासपत्र व शिलाई मशीनचे वाटप

By admin | Published: April 02, 2016 2:35 AM

वर्धा लोकसभा मतदार संघातील शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवांना तसेच त्यांच्या वारसांना किसान विकासपत्र तसेच शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

सामाजिक उपक्रम : शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलीला दत्तक घेणाऱ्या जावंधिया दाम्पत्याचा सत्कारदेवळी : वर्धा लोकसभा मतदार संघातील शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवांना तसेच त्यांच्या वारसांना किसान विकासपत्र तसेच शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. एका विशेष कार्यक्रमात खासदार रामदास तडस यांच्या हस्ते सदर वाटप करण्यात आले. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने तर अतिथी म्हणून खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष शोभा तडस, माजी आमदार अरूण अडसड, माजी आमदार दादाराव केचे, नागरी बँकेचे अध्यक्ष अनिल जोशी, धामणगाव बाजार समितीचे सभापती मोहन इंगळे, डॉ. शिरीष गोडे आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी वर्धा लोकसभा मतदार संघातील ४० शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रती ५ हजाराचे किसान विकासपत्र तसेच शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.यावेळी संध्या पुसदेकर, प्रणाली देवारे, सुलोचना मोडक, नंदा मुनेश्वर, रेश्मा तेलंग, रामभाऊ राऊत, महेंद्र मोहिजे यांना शिलाई मशिनचे तर शरद डहाके, कल्पना पारधी, उमा तायडे, पद्मा जावंधिया, सुभद्रा मांढरे, पद्मा उईके, अजय खापरीकर, मीनाक्षी घोडे, मीना येडांगे, रत्ना सारण, शोभा ढोके, जीजाबाई, अशोक दांडेकर, अल्का गणगणे, विजया पेठे, विठ्ठल महाकाळकर, सुनंदा गडकरी, बेबी हिवरकर, मंगेश पोटफुले, मनिषा भावरकर, शोभा लोणारे, विनोद काकडे, घनश्याम उंबरकर, सुशिला पांडे, मारोतराव काकडे, पुष्पा देशमुख, अल्का भगत, आदींना किसान विकासपत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी खा. तडस म्हणाले, आयुष्यात अनेक आंदोलने केली, संघर्ष केला. शेतकरी, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी प्रसंगी कारागृहात गेलो. त्यामुळे कार्यकर्ते हेच माझी पुुंजी राहिली आहे. तळागाळाच्या माणसाला मोठे करण्याचे काम भाजपाने केले आहे. चहा विकणाऱ्या माणसाला देशाला पंतप्रधान केले. माझ्या सारख्या सामान्य माणसाला खासदार केले. या परिसराचा लोकप्रतिनिधी म्हणून १० शेतकऱ्यांची निवड करून त्यांचे कर्ज माफ करण्याची जबाबदारी मी स्वत: पेलणार असल्याचे ते म्हणाले. इतरांची दु:खे जाणून घेणारा तळागाळातील नेता म्हणून खासदार तडस यांनी ओळख राहिली आहे असे विचार माजी आमदार अडसड यांनी व्यक्त केले. माजी आमदार केचे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनीही मनोगत व्यक्त केले. शेतकरी आत्महत्याग्रस्त महिला भावना शरद डहाके यांच्या ७ महिन्याच्या मुलीला दत्तक घेतल्याबद्दल गिरीराज जावंधिया व रिना जावंधिया या जोडप्याचा अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक फुलकरी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन समीर ढोक यांनी तर आभार नगरसेवक राहुल चोपडा यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला न. प. उपाध्यक्ष विजय गोमासे, मुकेश भिसे, जि.प. सदस्य किशोर मडावी, जयंत येरावार, कृष्णकांत शेंडे, बंडू जोशी, चंदू ठाकरे, तसेच भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शहरातील नागरिकाम्ची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(प्रतिनिधी)