लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यात या आजारावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे खा. रामदास तडस यांनी भेट देवून आढावा घेऊन आजची परिस्थिती जाणून घेतली.जिल्हयात कोरोणा विषाणूच्या प्रादुभार्वास प्रतिबंध करण्याकरिता संपूर्ण जिल्हयात संचार बंदी करण्यात आलेली आहे. परंतु जिल्हयातील शेतक-यांचा कापुस, हरभरा, गहु, तूर, संत्रा इत्यादी शेतमाल काढावयाचा असल्यामुळे अनेक अडचणी येत आहे, शेतक-यांना शेतामध्ये काम करण्याकरिता मजुर मिळत नसल्यामुळे तसेच पावसाळी वातावरणामुळे अनेक पिकाचे नुकसान होऊ शकते या करिता आपण शेतक-यांना शेतमाल काढण्याची परवानगी देण्यात यावी, त्यांची अडवणूक करुन त्रास देवू नये. तसेच कृषी आधारीत उद्योग धंदे बंद करण्यात आलेले आहे. याकरिता आपण कृषी आधारित उद्योग धंदे जसे जिनिंग अॅन्ड पे्रसींग मध्ये कापुस प्रक्रिया व त्यापासून निघणारी सरकी, तेल व्यवासाय, जिंनिंग व कृषी उद्योगा मध्ये दिवसपाळी व रात्रपाळी कामकरणारे, कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणा-या कंपन्या दालमिल, आॅइलमील, गहु, कारखाने उद्योग व्यवसाय करणार यांच्यावर सुध्दा कोणतही कार्यवाही करु नये तसेच या संबधीत आपल्या अधिनस्त आदेश काढून सर्वांना कळवावे अश्या सुचना यावेळी खासदार रामदास तडस यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.वर्धा शहरात भाजी विक्रेत्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व तुकडोजी ग्राउंड येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. परतु एकाच ठिकाणी असल्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढू शकते याकरिता प्रत्येक वार्डामध्ये भाजीपाल्याची व्यवस्था करुन देण्यात यावी जेणेकरुन गर्दीचे प्रमाण कमी होऊ शकेल. वर्धा लोकसभा क्षेत्रातील अनेक विद्यार्थी व नोकरदारवर्ग जिल्हाबाहेर, अनेक राज्यात आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु संपुर्ण संचारबंदी असल्यामुळे त्यांना अनेक अडचणी येत आहे त्यांना जिल्हयात आणण्याकरिता किंवा तिथेच त्या सर्व व्यवस्था करण्याकरिता तेथील संबधीत जिल्हयाधिकारी सोबत संपर्क साधून व्यवस्था करण्याबाबतसुध्दा सुचना यावेळी खासदार रामदास तडस यांनी दिल्या.वर्धा जिल्हात जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव नियत्रणात आणण्याखाली प्रभावी कार्य सुरु आहे. आपल्या जिल्हयात कोरोना ग्रस्त रुग्ण नसला तरी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करुन जिल्हयात कोरोना वायरस प्रादुर्भाव थांबविण्यासाठी चांगले प्रयत्न केलेले आहे. सर्व नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत मध्ये सर्व परीसर स्वच्छ राखत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये, प्रशासनाला सहकार्य करा, प्रशासनाच्या सुचनाचे पालन करा, घरीच रहा, सुरक्षित रहा असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.