लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, त्यासाठी सरकारने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या. कोरोनाच्या धास्तीने आधीच पशूपालन व्यवसाय अडचणीत आला असताना आता पशूंसाठी खाद्य खरेदी करून ते खाऊ खालणेदेखील होऊ लागले आहे. संचारबंदीत पशू खाद्याचाही मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे पक्षी मारण्याची परवानगी मिळण्याबाबतचे अनेक अर्ज जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे दाखल झाले असून पशुसंवर्धन विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.मागील तीन ते चार महिन्यांपासून जिल्ह्यातील ४०० च्यावर कुक्कूटपालन व्यावसायिक कोरोना आजारामुळे अडचणीत आले आहे. कोरोनाच्या धास्तीने तर नागरिकांनी कोंबड्यांची खरेदी देखील थांबविली आहे. तरीही काही पोल्ट्री चालकांनी पक्ष्यांचे संगोपन करणे सुरूच ठेवले होते. आता देशभरात संचारबंदी लागू झाली आहे. पोल्ट्रीमधील पक्ष्यांना खाण्यासाठी लागणारे खाद्य मिळणे कठीण झाले आहे. बंदमुळे वाहतूक थांबली आहे. राज्य शासनाच्या पशूसंवर्धन आयुक्तांनी परिपत्रक काढून पशुखाद्य विक्री सुरू ठेवण्याचे आदेश दिले असले तरीही दुकानांमध्ये खाद्याचा माल नाही. त्यामुळे पक्ष्यांचे संगोपन करायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पोल्ट्री धारकांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी यांच्याकडे पक्षी मारण्यासाठी परवानगी मिळण्याबाबतचे अर्ज दाखल केले आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून याची दखल घेतल्या जात नसल्याचा आरोप पोर्ल्ट्री धारकांकडून होत आहे. खाद्य मिळत नसल्याने पक्षी जगवायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
Corona Virus in Wardha; पशुखाद्य मिळत नसल्याने कोंबड्या मारण्याची परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 4:50 PM
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, त्यासाठी सरकारने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या. कोरोनाच्या धास्तीने आधीच पशूपालन व्यवसाय अडचणीत आला असताना आता पशूंसाठी खाद्य खरेदी करून ते खाऊ खालणेदेखील होऊ लागले आहे.
ठळक मुद्देपोल्ट्री व्यावसायिक अडचणीत दुकानात पशुखाद्याची टंचाई