शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

20 जणांनी लाच घेतली तरी खुर्ची अद्यापही कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 5:00 AM

लाचलुचपत विभागाकडून अनेकदा लाच न देण्यासाठी व घेण्यासाठी जनजागृती केली जाते. मात्र, अनेक जण कामे लवकर करण्यासाठी किंवा प्रकरण दाबण्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारतात. लाच मागणाऱ्यांकडून कामे अडकवून ठेवली जाते. परिणामी, संबंधित व्यक्तीला लाच द्यावीच लागते. भ्रष्टाचाराची ही कीड मोडून काढण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. मागील काही वर्षांत या विभागाने लाचखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई करीत बेड्या ठोकल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लाच देणे आणि घेणे हा गुन्हा असतानाही अनेक अधिकारी, कर्मचारी  झटपट कामे करण्यासाठी लाचेची मागणी करतात आणि नागरिक त्याला लाचही देतात. मात्र, अशांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केल्या जात असून, मागील तीन वर्षांत २० लाचखोरांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आले. मात्र, न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीक्षेत असल्याने अद्याप कुणालाही बडतर्फ करण्यात आले नसल्याने आजही त्यांची खुर्ची कायम असल्याचे दिसून येत आहे. लाचलुचपत विभागाकडून अनेकदा लाच न देण्यासाठी व घेण्यासाठी जनजागृती केली जाते. मात्र, अनेक जण कामे लवकर करण्यासाठी किंवा प्रकरण दाबण्यासाठी लाचेची रक्कम स्वीकारतात. लाच मागणाऱ्यांकडून कामे अडकवून ठेवली जाते. परिणामी, संबंधित व्यक्तीला लाच द्यावीच लागते. भ्रष्टाचाराची ही कीड मोडून काढण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. मागील काही वर्षांत या विभागाने लाचखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई करीत बेड्या ठोकल्या. मात्र, या वर्षात केवळ दोनच कारवाई झाल्याने या विभागाला आज बुस्टर देण्याची गरज निर्माण झाली आहे.  २०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत तब्बल २० लाचखोर एसीबीच्या गळाला लागले आहेत. २०१९ मध्ये १० लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. तर २०२० मध्ये ८ लाचखोर पोलिसांच्या गळाला लागले. मात्र, २०२१ मध्ये केवळ २ सापळे यशस्वी झाले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे. २०१९ पासूनच्या प्रकरणात अजूनही न्यायालयाने निकाल दिला नसल्याने लाचखोरांना निलंबित केले असून, अजूनही त्यांची खुर्ची कायम असून त्यांना बडतर्फ करण्यात आलेले नाही. त्यामुळे अशांवर तत्काळ कारवाई करण्यासाठ त्यांना बडतर्फ करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे दिसून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बडतर्फ करण्याचा मुहूर्त सापडेना-   लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील तीन वर्षांत केलेल्या कारवाईत तब्बल २० लाचखोरांना अटक केली असून, त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. मात्र,-   आरोपींना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई ही त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात शिक्षा लागल्यावर केली जाते. अद्याप २०१९ ते २०२१ पर्यंत दाखल गुन्ह्यांत कोर्टाने निकाल दिलेला नसल्याने आरोपींवर नोकरीतून काढण्याची वा बडतर्फ करण्याची कारवाई झालेली नाही.

कुणी लाच मागितली तर साधावा संपर्क...-   लाच घेणे व देणे दोन्ही गुन्हा आहे. कुणी जर कायदेशीर कामासाठी, शासकीय, निमशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी आपणास शासकीय फी व्यतिरिक्त लाच मागत असल्यास किंवा शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना कुणी बेकायदेशीर काम करण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न करीत असल्यास मुख्य पोस्ट ऑफिस चौकातील बीएसएनएल ऑफिससमोर असलेल्या लाचलुचपत विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा १०६४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करावा. 

लाचखोरीत महसूल नंबर वन, पोलीस तळाला२०१९ ते २०२१ या तीन वर्षांचा विचार करता लाचखोरी संबंधाने सापळा कारवाई झालेल्या विभागांपैकी महसूल विभाग, वनविभाग, शिक्षण विभाग आणि गृहविभाग आघाडीवर असल्याचे झालेल्या कारवाईवरून दिसून आले आहे.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण