लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जन्म घेणे हे पूर्वाश्रमीचे फळ ही मानसिकता होती. ती बदलविण्याचे काम डॉ. आंबेडकर यांनी केले. चातुवर्ण व्यवस्था निर्माण करून मनुस्मृती प्रमाणे राज्य कारभार चालविल्या जात होता, ती मनुस्मुती जाळण्यापूर्वी डॉ. आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला रायगडावर जाऊन अभिवादन केले. मानवमुक्तीची चळवळ महात्मा फुलेंनी केली. डॉ. आंबेडकर त्या चळवळीचे कळस झाले. ते मानवमुक्तीचे प्रणेते आहेत. त्यांना भारतात जात न मानणारा समाज निर्माण करायचा होता, असे विचार डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले.परिवर्तनधारा साहित्य कला मंच, वर्धा द्वारा आयोजित सहाव्या आंबेडकरी विचार परिषदेचे उद्घाटन बुधवारी झाले. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कुत्तरमारे, परिवर्तनधारा साहित्य कला मंचचे अध्यक्ष प्रा. राजेश डंभारे, प्रा. प्रशांत जिंदे यांची उपस्थिती होती.डॉ. आंबेडकर पूर्व तयारी करून चळवळी उभ्या करीत होते. आज पूर्व तयारी न करता चळवळी उभ्या केल्या जातात. त्यामुळे चळवळीला अपयश येते. जयभीम म्हटल्यांनी जयभीम वाला होत नाही. ते कृतीतून दिसला पाहिजे, असेही यावेळी डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले. प्रशांत कुत्तरमारे यांनी महापुरूषांची चळवळ पुढे नेण्याकरिता नवीन चळवळ निर्माण करायची गरज असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रा. राजेश डंभारे यांनी केले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन मुकुंद नाखले यांनी केले. प्रकाश कांबळे यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन सुनील ढाले यांनी केले तर आभार प्रा. चरण गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. प्रवीण वानखेडे, प्रा. महेंद्र वानखेडे, दीपक कांबळे, जीवन निमसडकर, डॉ. हरिष पेटकर, सुभाष चंदनखेडे, डॉ. अनिता ताकसांडे, डॉ. माधुरी झाडे, सावित्री सोनटक्के, सीमा पाटील, आरती सोनारकर, कांचन अवथरे, पल्लवी पाटील, हरिका ढाले, कैलास भगत, मिलिंद पाटील, अॅड. अविनाश भगत, दिनेश भगत, दिनेश वाणी, प्रकाश जिंदे, संदीप कांबळे, जय उके यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
आंबेडकरांना जात न मानणारा समाज निर्माण करायचा होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 6:00 AM
डॉ. आंबेडकर पूर्व तयारी करून चळवळी उभ्या करीत होते. आज पूर्व तयारी न करता चळवळी उभ्या केल्या जातात. त्यामुळे चळवळीला अपयश येते. जयभीम म्हटल्यांनी जयभीम वाला होत नाही. ते कृतीतून दिसला पाहिजे, असेही यावेळी डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले. प्रशांत कुत्तरमारे यांनी महापुरूषांची चळवळ पुढे नेण्याकरिता नवीन चळवळ निर्माण करायची गरज असल्याचे सांगितले.
ठळक मुद्देडॉ. ऋषिकेश कांबळे : सहाव्या आंबेडकरी विचार परिषदेचे उद्घाटन