लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोलिसांनी हिंगणघाट तालुक्यातील बोथुडा फाटा येथे सापळा रचून नाकेबंदी करीत विदेशी दारूसह ९.९४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तीन दारू विक्रेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, एम. एच. ३२ ए. ३३६६ क्रमांकाच्या कारने जिल्ह्याबाहेरून दारू आणून ती परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना वितरीत केली जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षकाच्या विशेष पथकाला मिळाला. त्याआधारे पोलिसांनी बोथुडा फाटा परिसरात नाकेबंदी करून काही वाहनाची तपासणी केली. दरम्यान एम.एच. ३२ ए. ३३६६ क्रमांकाच्या कारची पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याचे पोलिसांना दिसले. तो पोलिसांनी जप्त केला आहे. सदर प्रकरणी कवडू नामदेव फटींग (३८), सतीश कमलाकर राऊत (४४) दोन्ही रा. संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट व संजु तायवाडे रा. पांढुर्णा, मध्यप्रदेश यांच्याविरूद्ध हिंगणघाट पोलिसांत दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात सुधीर कोडापे, दीपक वानखेडे, दिनेश तुमाने, तुषार भुते, रंजित काकडे, चंद्रकांत जिवतोडे, विलास गमे, योगेश चन्ने, सतीश जांभुळकर, राजेश पाचरे, अमोल तिजारे, योगेश घुमडे, अजय वानखेडे, राहुल गोसावी यांनी केली. परिसरात कुठेही दारूची विक्री होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दारूसाठ्यासह ९.९४ लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:17 AM
पोलिसांनी हिंगणघाट तालुक्यातील बोथुडा फाटा येथे सापळा रचून नाकेबंदी करीत विदेशी दारूसह ९.९४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तीन दारू विक्रेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
ठळक मुद्देतिघांविरूद्ध गुन्हे दाखल : सापळा रचून केली बोथुडा परिसरात करवाई