लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील वायफड येथील शेतकऱ्याची अनुदानाची रक्कम बँक आॅफ बडोदाच्या व्यवस्थापनाने कर्ज खात्यात जमा केली आहे. ती रक्कम परत देण्यात यावी, यासाठी बुधवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. व याबाबतची अडचण सांगितली.या आंदोलनाचे नेतृत्व भास्कर इथापे यांनी केले. बँक आॅफ बडोदा शाखा वायफड येथील शेतकरी खातेदार यांना विविध योजने अंतर्गत अनुदान प्राप्त झाले. यामध्ये गुलाबी बोंडअळी, सोयाबीनचे अळीने झालेले नुकसान व श्रावणबाळ योजना यांच्या अनुदानाचा समावेश होता. सदर अनुदानाची रक्कम बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने कर्ज खात्यात वळती केली. कर्जखात्यात अशा रक्कमा वळत्या करता येत नाही. तरीही हा प्रकार घडला. शासनाने या शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे.हे सर्व खातेदार कर्जमाफीचे लाभार्थी आहे. त्यामुळे यांचे अनुदान खात्यात वळते करणे म्हणजे यांना मानसिक त्रास देण्याचाच प्रकार असल्याचा आरोप रमेश भगत, माणिक पुरी, राजकन्या भोसले, ज्योती जोटे, वसंत मुळे, पृथ्वीराज शिंदे, विक्रम खडसे, वासुदेव पडोळे, रामभाऊ झोटींग, नरेश मुळे, विश्वनाथ वांदीले, संतोष फुलकरी, रामदास सोळंके, पंकज कुकरे, प्रमोद ढोक, गजानन बकाणे, कमलाबाई तलवारे, विलास पुरी, मोहोड, गजानन डबाले, लक्ष्मण मोहोड, वामन जोले, राजू मुळे, मारोती वाके, किसना वांदीले, अशोक मसराम, कवडू थोटे, झगलेराव पवार, बरक पवार, बळवंत चौधरी, भिमराव लोहकरे, विजय वानखेडे, बाबा शेख आदींसह शेतककऱ्यांनी केला आहे.आजंतीतही असाच प्रकारहिंगणघाट तालुक्यातील आजंती येथील शेतकरी वाल्मिक काशीनाथ भालशंकर यांना बोंडअळीचे अनुदान शासनाकडून मिळाले. बँक आॅफ बडोदाच्या शाखेत हे अनुदान जमा झाले. त्यांना १३,६०० रूपयाचे अनुदान मिळाले. मात्र त्यांच्या खात्यात ही रक्कम दाखविण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी हिंगणघाट येथे जावून बँकेतचौकशी केली तर त्यांना कर्जाच्या पुनर्गठनामध्ये ही रक्कम जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. व बँकेने ही रक्कम परत देण्यास नकार दिला आहे. भालशंकर यांच्याकडे आठ एकर शेती असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बँकेच्या धोरणाविरूद्ध रोष आहे.
अनुदानाची रक्कम कर्जखात्यात केली वळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 11:30 PM
तालुक्यातील वायफड येथील शेतकऱ्याची अनुदानाची रक्कम बँक आॅफ बडोदाच्या व्यवस्थापनाने कर्ज खात्यात जमा केली आहे. ती रक्कम परत देण्यात यावी, यासाठी बुधवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
ठळक मुद्देबँक आॅफ बडोदातील प्रकार : वायफडचे शेतकरी अडचणीत