लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नवरात्रोत्सवादरम्यान वर्धेत होणारे अन्नदान एक विशेष महत्त्व प्राप्त करून आहे. त्याची सर्वत्र चर्चा आहे. या अन्नदानादरम्यान मात्र शहरातील रस्त्यावर होत असलेला कचरा पर्यावरणाकरिता धोक्याचा असून त्याच्या व्यवस्थापनाकडे कोणाचेही लक्ष नाही. पालिका तर जणू ही आपली जबाबदारीच नाही असे वागत आहे. यामुळे पुन्हा वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने रस्त्यावर उतरत मध्यरात्रीपर्यंत कचरा उचलण्याचे काम सुरू आहे.नवरात्रादरम्यान या शहरात अनेक सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात लंगरचे आयोजन करण्यात येते. या लंगरमध्ये नागरिकांना अन्न वितरण करताना त्यांच्याकडून प्लास्टिकच्या वस्तुंचा वापर करण्यात येतो. हेच प्लास्टिकचे द्रोण, वाट्या नाल्यात अडकून सांडपाण्याची समस्या निर्माण करीत असल्याचे समोर आले आहे. लंगर नंतर ते उचलण्याची जबाबदारी मंडळाने घेणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही. परिणामी शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे पडून असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांकडून रस्त्यावर टाकण्यात आलेले द्रोण उचलण्याची आपलीच जबाबदारी समजून वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने रात्री रस्त्यावरील गर्दी कमी झाल्यानंतर हा कचरा उचलण्याचे काम सुरू होत आहे. गत वर्षीही वैद्यकीय जनजागृतीमंचाच्यावतीने ही जबाबदारी पार पाडली होती. यंदाही ती सुरूच आहे. वर्धेत पर्यावरण रक्षणाकरिता वैद्यकीय जनजागृती मंचाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यातील एक हा उपक्रम म्हणता येईल.पर्यावरण रक्षणाकरिता अनेक उपक्रमवर्धा शहरातच नाही तर आसपासच्या गावात पर्यावरण जनजागृतीकरिता वैद्यकीय जनजागृती मंचाच्यावतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात पर्यावरणपुरक गणेश विसर्जनासह निर्माल्याची व्यवस्था करण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात येत आहे. नागरिकांत आरोग्यविषयक जनजागृती करण्याकरिता त्यांच्याकडून विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
लंगर करणारे अनेक; पण कचरा उचलणारे कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:11 PM
नवरात्रोत्सवादरम्यान वर्धेत होणारे अन्नदान एक विशेष महत्त्व प्राप्त करून आहे. त्याची सर्वत्र चर्चा आहे. या अन्नदानादरम्यान मात्र शहरातील रस्त्यावर होत असलेला कचरा पर्यावरणाकरिता धोक्याचा असून त्याच्या व्यवस्थापनाकडे कोणाचेही लक्ष नाही.
ठळक मुद्देव्हीजेएम रस्त्यावर : कचरा उचलण्याकरिता फिरतात मध्यरात्री