महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे क्रमप्राप्त आहे. परंतु, यंदा सुरूवातीपासून बहुचर्र्चित ठरलेली २० वी पशुगणनना आता पुन्हा प्रत्यक्ष काम करणाऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारी ठरत असल्याचे दिसते. पशुगणनेसाठी ३१ डिसेंबर ही अखेरची मुदत होती. सद्यस्थितीत विदर्भातील वर्ध्यासह कुठल्या जिल्ह्यात पशुगणनेचे किती काम झाले, याची माहिती जाणून घेतली असता जबाबदार अधिकाऱ्यांकडेच माहिती उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली. शिवाय त्यांनी पशुगणनेसाठी मुदतवाढ मिळेल, असे सांगून वेळकाढू धोरण अवलंबिल्याने २० वी पशुगणनना अपूर्णच असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.प्राप्त माहितीनुसार, १९ वी पशुगणना २०१२ मध्ये झाली होती. त्यानंतर २०१७ मध्ये पशुगणना होणे क्रमप्राप्त होते. परंतु, पशुसंवर्धन विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळेच २० व्या पशुगणनेचे प्रत्यक्ष काम २०१८ च्या आॅक्टोबर महिन्यात सुरू करण्यास संबंधितांकडून हिरवी झेंडी देण्यात आली. ३१ डिसेंबर ही डेडलाईन देत संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच आॅनलाईन पद्धतीचा अवलंब करून टॅबच्या सहाय्याने २० वी पशुगणना पूर्ण करण्याचेही निश्चित करण्यात आले. त्यानंतर वर्धा जिल्ह्यात पशुगणनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवातही करण्यात आली. परंतु, सद्यस्थितीत जिल्ह्यातील किती पशुंची नोंद टॅबच्या सहाय्याने पशुसंवर्धन विभागाने घेतली, याची माहिती जाणून घेतली असता ही माहितीच वर्धा जिल्हा व नागपूर प्रादेशिक पशुसंवर्धन विभागाकडे नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही पशुगणनना नेमकी कशा पद्धतीने होत आहे, याबाबत पशुसंवर्धन विभागातीलच कर्मचाऱ्यांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पशुगणना करणाऱ्यांना जिल्ह्यातील गावांसह शहरातील प्रत्येक घरात जावून पशुपालकाजवळ असलेल्या विविध पशुंची माहिती आॅन लाईन व आॅफ लाईन पद्धतीचा अवलंब करीत टॅबच्या सहाय्याने भरायची आहे, हे विशेष.टॅबमध्ये तांत्रिक बिघाडआॅनलाईन पद्धतीचा अवलंब करीत वर्धा जिल्ह्यातील पशुंची गणना करण्यासाठी ११४ टॅब, पॉवर बँक व सिम १५ आॅक्टोबरला उपलब्ध करून देण्यात आले. त्याच्या सहाय्याने प्रत्यक्ष कामही सुरू आहे. परंतु, टॅबमध्ये असलेले पूर्वीचे २.० अॅप वर्जन प्रत्यक्ष काम करणाºयांसाठी त्रासदायक ठरत असून त्यात तांत्रिक बिघाड येत असल्याने ३.० हे वर्जन टाकून पशुगणना करण्याच्या सूचना संबंधितांनी गणनेचे काम करणाºयांना दिल्या असल्याचे सांगण्यात आले.टॅबचा वापर करून आॅनलाईन पद्धतीने पशुगणनेचे काम सध्या सुरू आहे. ३१ डिसेंबर ही पशुगणनेची अखेरची मुदत असली तरी सध्या कुठल्या जिल्ह्यात किती काम झाले, हे सांगता येत नाही. वरिष्ठांकडून पशुगणना पूर्णकरण्यासाठी कमीत कमी १५ दिवसांची मुदत वाढ मिळण्याची अपेक्षा आहे.- डॉ. किशोर कुमरे, प्रादेशिक सहआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, नागपूर.२० वी पशुगणना पूर्ण करण्यासाठी जिल्ह्याला ११४ टॅब, सिम व पॉवर बँक प्राप्त झाल्या. प्रत्यक्ष कामही सध्या सुरू आहे. परंतु, किती काम झाले, हे आमच्याकडे माहिती नसल्याने सांगता येणार नाही. ३१ डिसेंबर ही पशुगणना पूर्ण करण्याची अखेरची मुदत आहे.- डॉ. राजीव भोजने, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, वर्धा.
अन् २० वी पशुगणना अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:25 AM
प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे क्रमप्राप्त आहे. परंतु, यंदा सुरूवातीपासून बहुचर्र्चित ठरलेली २० वी पशुगणनना आता पुन्हा प्रत्यक्ष काम करणाºयांच्या अडचणीत भर टाकणारी ठरत असल्याचे दिसते. पशुगणनेसाठी ३१ डिसेंबर ही अखेरची मुदत होती.
ठळक मुद्दे३१ डिसेंबर डेडलाईन : अधिकाऱ्यांना मुदत वाढीची अपेक्षा