लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : इतवारा चौक परिसरात एक सुमारे तीन वर्षीय मुलगी रडत असल्याचे एका आॅटोचालकाच्या निदर्शनास आले. त्याने सदर मुलीला जवळ घेत विचारपूस केली असता घाबरलेली मुलगी साधे आपल्या आई-वडिलांचे नावही सांगत नव्हती. त्यानंतर सदर आॅटो चालकाने त्या चिमुकलीला सोबत घेवून शहर पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्या मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेण्यात आला. अवघ्या काही तासातच मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेवून तिला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास स्थानिक इतवारा चौकात एक तीन वर्षीय मुलगी रडत असल्याचे आॅटोचालक वकील शेख व कृष्णा रोहनकर यांना दिसले. त्यांनी सदर मुलीला धीर देत काय झाले याबाबतची विचारणा केली असता ती सुरूवातीला तिचे नावही सांगत नव्हती. परिसरात विचारपूस करूनही मुलीची ओळख पटेल याबाबतची माहिती न मिळाल्याने कदाचित ही मुलगी घर विसरली असावी असा कयास बांधून सदर दोन्ही व्यक्तींनी त्या मुलीला सोबत घेवून शहर पोलीस स्टेशन गाठले. तेथे कर्तव्यावर असलेल्या पीएसआय चेतन बोरखडे, श्रीकांत खडसे यांनी त्या घाबरलेल्या चिमुकलीला धीर देत सुरूवातीला तिला तिच्या नावासह आई-वडिलांचे नाव आणि पत्ता विचारला. बराच वेळ भांबावलेल्या अवस्थेत असलेली मुलगी सुमारे तास भऱ्यानंतर थोडीफार बोलायला लागली. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपल्या हाचलचालींना वेग देत अवघ्या काही तासातच तिच्या आई-वडिलांचा शोध घेतला. त्यानंतर सदर मुलीचे नाव माही असल्याचे पुढे आले. खात्रिपटल्यानंतर पोलिसांनी सदर तीन वर्षीय माहीला तिचे वडील विक्की केवल शेंडे यांच्या स्वाधीन केले. हरविलेल्या मुलीला सुखरुप पाहून विक्की शेंडे यांना अश्रू अनावर झाले होते.वडिलांच्या मागे-मागे पडली घराबाहेरप्रसूती झाल्याने माहीच्या आईवर बॅचलर रोडवरील डागा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी विक्की शेंडे यांना पत्नीसाठी डबा घेवून जायचे असल्याने त्यांनी मुलगी माही हिला शेजारच्या घरी नातेवाईकांकडे ठेवले होते. ते डब्बा घेवून जात असताना त्याच्याच मागे माही घराबाहेर पडली. परंतु, तेव्हा हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. काही रस्त्यांनी भटकंती केल्यानंतर रडत-रडत माही इतवारा चौक परिसरात पोहोचली. तेथे ती आॅटो चालकाला मिळाली. त्यांनी तिला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबियांचा शोध घेवून तिला त्यांच्या स्वाधीन केले.
अन् ‘माही’ आपल्या घरी पोहोचली सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:12 PM
इतवारा चौक परिसरात एक सुमारे तीन वर्षीय मुलगी रडत असल्याचे एका आॅटोचालकाच्या निदर्शनास आले. त्याने सदर मुलीला जवळ घेत विचारपूस केली असता घाबरलेली मुलगी साधे आपल्या आई-वडिलांचे नावही सांगत नव्हती. त्यानंतर सदर आॅटो चालकाने त्या चिमुकलीला सोबत घेवून शहर पोलीस स्टेशन गाठले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्या मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेण्यात आला.
ठळक मुद्देआॅटो चालकाची सतर्कता : इतवारा परिसरापर्यंत आली होती भटकत