लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : गावात जाण्याकरिता असलेल्या रेल्वेच्या बोगद्यातून जात असलेले दोन युवक दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होते. दरम्यान भाजयुमोचे जिल्हा चिटणीस गौरव गावंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पाण्यात उतरून या युवकांना बाहेर काढून वाचविले. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने गावात येण्या-जाण्याकरिता असलेल्या मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या गावामध्ये महामार्गावरुन गावामध्ये जाण्याकरिता रेल्वे गेट क्रॉसींग करून जावे लागत होते. गावासाठी फायदेशीर व सुरळीत रस्ता असताना काही दिवसापूर्वी ते गेट बंद करण्यात आले. पर्यायी व्यवस्था म्हणून गावात जाण्याकरिता रेल्वेच्या खालून आणि गावामध्ये असलेल्या मोठ्या नाल्याच्या साईडने बोगदा करून रस्ता दिला; पण काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला आणि ते पाणी बोगदाच्या दोन्ही साईडने साचले. रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असताना गावामध्ये बजाज फाउंडेशनचे कर्मचारी सर्व्हेकरिता आले होते. पाऊस सुरू झाल्याने ते गावात थांबले. व त्यानंतर पावसातच दहेगाववरुन सावंगीला जाण्यास निघाले. त्यांनी पाण्याची पातळी न पाहता दुचाकी त्या बोगद्यातून टाकण्याच्या प्रयत्न केला; पण पाण्याला प्रचंड ओढा असल्यामुळे ते दुचाकीसह पाण्यात वाहू लागले.ही घटना तेथून जात असलेल्या भाजयुमोचे जिल्हा चिटणीस गौरव गावंडे व त्यांच्या सोबत असलेले सहकारी धिरज भोवरकर, अमन वासे, अक्षय खोब्रागडे यांना दिसली. त्यांनी त्वरीत तेथे जावून त्या युवकांना वाचविले व दुचाकीसुद्धा पाण्याबाहेर काढली.
अन् ते युवक थोड्यात बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 12:56 AM
गावात जाण्याकरिता असलेल्या रेल्वेच्या बोगद्यातून जात असलेले दोन युवक दुचाकीसह पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होते. दरम्यान भाजयुमोचे जिल्हा चिटणीस गौरव गावंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पाण्यात उतरून या युवकांना बाहेर काढून वाचविले.
ठळक मुद्देदुचाकीसह डुबले होते पुराच्या पाण्यात