शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

अन् ‘त्या’ वृद्ध दाम्पत्यासाठी रेल्वे गाडी थांबली !

By admin | Published: March 30, 2016 2:24 AM

मदत केव्हा आणि कशी करावी हे महत्त्वाचे. ती अडचणीत सापडणाऱ्याला अचानक मिळाली तर ते एक मोठे कार्य ठरू शकते. ती चर्चेचा विषयही ठरते.

गार्डचा मानवतेचा परिचय : वर्धा स्थानकावरील घटना वर्धा : मदत केव्हा आणि कशी करावी हे महत्त्वाचे. ती अडचणीत सापडणाऱ्याला अचानक मिळाली तर ते एक मोठे कार्य ठरू शकते. ती चर्चेचा विषयही ठरते. अशीच मदत मंगळवारी रेल्वे गार्डने केल्यामुळे एका वृद्ध दाम्पत्याला रेल्वे स्थानकावरून पुढच्या प्रवासाला निघालेली रेल्वे गाडी मिळाली.वेळ रात्री सात सव्वासातची. वर्धा रेल्वे स्थानकावर पुरी-अजमेर रेल्वे गाडी येऊन थांबली. काही वेळातच ती प्रवाश्यांना घेऊन पुढच्या प्रवासाला निघाली. गाडी रेल्वे स्थानक सोडत असतानाच एक वृद्ध दाम्पत्य ती गाडी पाहून जोरजोराने अजमेर....अजमेर...म्हणून आवाज देत होते. हे दाम्पत्य ६५ ते ७५ वयातील असावे. गाडी सुटली होती. अशातच शेवटच्या डब्यात असलेल्या गार्डचे त्या दाम्पत्याकडे लक्ष गेले. त्यांचे आवाज देणे सुरूच होते. अखेर ते हतबल होऊन गाडीकडे बघत होते. या दाम्पत्याची व्यथा त्या गार्डच्या लक्षात आली. गार्र्डने त्यांच्याकडे हात दाखवून तिथेच थांबण्याचा सल्ला दिला आणि त्याच क्षणी वॉकीटॉकीच्या माध्यमातून चालकाशी संवाद साधला. काही क्षणातच गाडी थांबली. आणि त्या दाम्पत्याला गाडीत चढवून घेतले. त्यानंतर गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. अखेर शेवट गोड झाला. हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील प्रवासी बघत होते. अनेकदा अनेकांची गाडी सुटते. यासाठी रेल्वे कर्मचारी बांधील नाही. मात्र त्या गार्डने दाखविलेले औदार्य कौतुकास पात्रच ठरले नाही, तर मानवीयतेचा परिचय देणारे ठरले. प्रत्येकजण काही क्षणात घडलेल्या या घटनेचीच चर्चा करीत होते.(जिल्हा प्रतिनिधी)