शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

अन् ‘मेड इन वर्धा’ निर्माण करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 12:25 AM

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘मेड इन इंडिया’ चा नारा दिला होता. मात्र, मागील चार वर्षांत मोबाईलसह बुटापर्यंत सर्वच वस्तूंवर ‘मेड इन चायना’ लिहिल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देराहुल गांधी : शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी देण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘मेड इन इंडिया’ चा नारा दिला होता. मात्र, मागील चार वर्षांत मोबाईलसह बुटापर्यंत सर्वच वस्तूंवर ‘मेड इन चायना’ लिहिल्याचे दिसून येते. काँग्रेसचे सरकार देशात आल्यास ‘मेड इन इंडिया पासून मेड इन वर्धा’ पर्यंत वस्तू निर्माण करून बेरोजगारांना काम देऊ, असे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दिले. स्थानिक सर्कस मैदानावरील काँग्रेस संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.याप्रसंगी राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टिका केली. काँग्रेसच्या काळात सोयाबीनचा भाव ४ हजार ५०० होता. भाजपच्या काळात अडीच हजार क्विंटलने सोयाबीन विकावे लागत आहे. काँग्रेसच्या काळात तुरीला ९ हजार होता. तर भाजपच्या काळात तुरीचा भाव ४ हजार रुपये झाला. देशातील विविध प्रांतातील शेतकरी मोदी सरकारकडे हात जोडून कर्जमाफी मागत आहे. परंतु सरकार त्याला कर्जमाफी द्यायला तयार नाही. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली जाईल, असे भरीव आश्वासनही खा. राहुल गांधी यांनी दिले.स्थानिक नेत्यांनी केला मान्यवरांचा सत्कारजाहीर सभेत खासदार राहुल गांधी यांचा सत्कार आमदार रणजीत कांबळे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी केला. सोनिया गांधी, डॉ. मनमोहनसिंग, पी. चिदंबरम् आदींचा सत्कार आमदार अमर काळे, शेखर शेंडे, राधाकृष्ण विखे पाटील आदींनी केला.गांधीभूमी झाली काँग्रेसमयमहात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी आज अखिल भारतीय कॉंग्रेस पार्टीच्यावतीने सेवाग्राम परिसरात कार्यकारिणीची बैठक आणि शहरात पदायात्रा व जाहीर सभेचे आयोजन केले होते. यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह देशभरातील काँग्रेसचे नेते वर्ध्यात आले होते. खा.राहुल गांधी संबोधित करणार असल्याने महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी वर्ध्यात दाखल झाले होते. त्यामुळे शहरातील मार्गामार्गावर हातात कॉग्रेसचे झेंडे आणि गळ्यात दुपट्टाधारण केलेले कार्यकर्ते फि रताना दिसत होते.कार्यकर्त्यांचे लोंढे सकाळपासूनच दाखलकाँग्रेसच्या कार्यक्रमाकरिता देशभरातील नेते मंडळी आणि महाराष्ट्रातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित झाले होते. काही पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवारी तर काही मंगळवारी सकाळापासून वर्ध्यात आले. त्यांनी शहरातील जेल रोडवर आपली वाहने उभी केली होती. तर काही कार्यक्रमस्थळी सर्कस मैदानावर उपस्थित झाले. काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाºयांचे लोंढे गांधी चौकात दाखल झाल्याने घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस